---Advertisement---

तेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील

On: रविवार, जानेवारी 20, 2019 12:38 PM
---Advertisement---

शनिवारी(19 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात नाबाद शतक झळकावले. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले आहे.

अमलाने या सामन्यात या 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 120 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या आहेत. आमलाचे हे वन-डे क्रिकेटमधील 27वे शतक आहे. त्याचप्रमाणे तो वन-डेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पाचव्या क्रमाकांवर आला आहे.

वन-डेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 49 शतके केली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 39 शतकांसह विराट कोहली आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग असून त्याने 30 शतके केली आहेत. तर सनथ जयसुर्या 28 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे अमलाला या यादीत आणखी वरचे स्थान मिळवण्याची संधी आहे. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत अजून एक जरी शतक केले तर तो जयसुर्याच्या 28 शतकांची बरोबरी करेल.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 266 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तान समोर 267 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते.

हे आव्हान पाकिस्तानने इमाम-उल-हकच्या 86 आणि मोहम्मद हाफिजच्या नाबाद 71 धावांच्या जोरावर 49.1 षटकात सहज पार केले. यामुळे पाकिस्तानने या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्याचबरोबर पहिल्यांदाच आमलाचे प्रथम फलंदाजी करतानाचे शतक व्यर्थ गेले आहे. याआधी त्याने प्रथम फलंदाजी करताना 20 शतके केली असून त्या सगळ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी ठरली आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू – 

49 – सचिन तेंडुलकर

39 – विराट कोहली

30 – रिकी पाँटिंग

28 – सनथ जयसुर्या

27 – हाशिम अमला

25 – एबी डिविलियर्स/कुमार संगकारा

महत्त्वाच्या बातम्या-

सातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत

न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया

हा खेळाडू करतो एमएस धोनीला रोज फोन…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment