बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या अंतिम अकरामध्ये एक मोठा बदल झाला. मागील सामन्यात चमकदार कामगिरी करणारा कुलदीप यादव बाकावर बसला, तर त्याच्याजागी जयदेव उनाडकट याला संघात घेतले. त्याने मैदानावर पाऊल ठेवताच मोठ्या विक्रमांची नोंद केली.
जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat)12 वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात परतला आहे. यामुळे तो सर्वाधिक कसोटी सामन्याला मुकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने विकेटकीपर दिनेश कार्तिक याला मागे टाकले आहे. कार्तिकने 87 कसोटीनंतर भारताच्या अंतिम अकरामध्ये जागा मिळवली होती. त्याचबरोबर तो जागतिक स्तरावर सर्वाधिक कसोटी सामन्याला मुकणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे.
उनाडकटने 16 डिसेंबर 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली, मात्र भारताच्या कसोटी संघात जागा मिळणे अशक्य झाले. तेव्हापासून भारताने 118 कसोटी सामने खेळले. कार्तिकने 2010 पासून ते 2018 या काळात 87 कसोटी सामन्यानंतर संघपुनरागमन केले. Most consecutive Tests missed between appearances by Indian Player Jaydev Unadkat, BANvIND 2nd Test
31 वर्षीय उनाडकटला त्याच्या पदार्पणाच्या कसोटीमध्ये एकही विकेट घेता आली नव्हती. आता त्याला दुसरी संधी मिळाली असून तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
कसोटीमध्ये सर्वाधिक सामन्याला मुकण्याच्या विक्रम इंग्लंडच्या गॅरेथ बॅटी याच्या नावावर आहे. तो 2005 ते 2016 या कालवधीदरम्यान 142 कसोटी सामन्यांना मुकला होता. तिसऱ्या क्रमांकावरही इंग्लंडचाच खेळाडू आहे. मार्टिन बिकनेल हे1993 ते 2003 दरम्यान 114 कसोटी सामन्यांना मुकले आहेत.
सर्वाधिक सलग कसोटी सामन्याला मुकणारे खेळाडू-
142 – गॅरेथ बॅटी (2005-16)
118 – जयदेव उनाडकट (2010-22)*
114 – मार्टिन बिकनेल (1993-03)
109 – फ्लॉइड रीफर (1999-09)
104 – युनिस अहमद (1969-87)
103 – डेरेक शॅकलटन (1951-63)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एफसी गोवा विजयी हॅटट्रिकच्या शोधात; जमशेदपूर एफसी सलग आठवा पराभव टाळण्याच्या प्रयत्नात
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने जिंकला टॉस, भारताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन