---Advertisement---

तब्बल ८७ सामन्यानंतर त्या खेळाडूची भारतीय संघात वापसी, सर्व विक्रम मोडीत

---Advertisement---

बेंगलोर | आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. त्याची निवड वृद्धीमान सहाच्या जागी झाली.

हा खेळाडू शेवटचा कसोटी सामना १७ जानेवारी २०१० रोजी खेळला होता. हा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात झाला होता. त्यानंतर आज तब्बल ८ वर्षांनी या खेळाडूला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

या काळात भारतीय संघाने तब्बल ८७ कसोटी सामने खेळले. कमबॅक आणि शेवटचा कसोटी सामना यात सर्वाधिक सामने न खेळलेल्या खेळाडूचा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे. यापुर्वी हा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर होता. त्याने ८३ सामन्यानंतर कसोटी पुनरागमन केले होते.

कार्तिकने भारताकडून आजपर्यंत २३ कसोटी सामने खेळले असुन त्यात २७.७७च्या सरासरीने २००० चेंडूत १००० धावा केल्या आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment