आयपीएलच्या 2025 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाची घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. संघाला आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने आरसीबीला 5 विकेट्सनी पराभूत करत महत्त्वाचा विजय मिळवला.
या पराभवासह आरसीबीने आयपीएलमधील एका वेन्यूवर सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. बंगळुरूच्या मैदानावर आरसीबीलने एकूण 46 सामने हरले असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा दिल्ली मैदानावर 45 पराभवांचा विक्रम मागे टाकला आहे.
आयपीएल संघ | मैदान (होम ग्राऊंड) | पराभवांची संख्या |
---|---|---|
आरसीबी | बंगळुरु (चिन्नास्वामी) | 46 |
दिल्ली कॅपिटल्स | दिल्ली | 45 |
केकेआर | कोलकाता | 38 |
या हंगामात आरसीबीला घरच्या मैदानावर अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. संघाने आतापर्यंत गुजरात टायटन्स (8 विकेट्स), दिल्ली कॅपिटल्स (6 विकेट्स) आणि आता पंजाब किंग्स (5 विकेट्स) विरुद्ध पराभव पत्करले आहेत.
पावसामुळे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामना 14 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 95 धावा केल्या. टिम डेव्हिडने सर्वाधिक 50 धावा केल्या. पंजाबकडून नेहाल वढेराने 33 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.