इंडियन प्रीमिअर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न ओढवलेली नामुष्की मुंबई इंडियन्स संघावर या हंगामात ओढवली गेली. मुंबईला सोमवारी (दि. ०९ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५२ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा मुंबईचा या हंगामातील नववा पराभव होता. यामुळे मुंबईने आपलाच नकोसा विक्रम मोडला.
नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने या सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईचा हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या खेळाडूंनी चुकीचा सिद्ध केला. कोलकाताने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. मात्र, कोलकाताच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव ११३ धावांवरच संपुष्टात आला. अशाप्रकारे मुंबईला हा सामना ५२ धावांनी गमवावा लागला.
या पराभवासह मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक सामने गमावण्याचा आपलाच नकोसा विक्रम मोडला. मुंबईला या हंगामात ९ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी त्यांनी २००९, २०१८ आणि २०१४ या आयपीएल हंगामात प्रत्येकी ८ सामने गमावले होते. त्यानंतर मागील वर्षी म्हणजेच २०२१ तसेच, २०१६ आणि २०१२ या आयपीएल हंगामात मुंबईने प्रत्येकी ७ सामने गमावले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स संघाला सर्वात यशस्वी आयपीएल संघ म्हणून ओळखले जाते. मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाच आयपीएल हंगामांचे विजेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मुंबईच्याच नावावर आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१) आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
आयपीएलच्या एका हंगामात मुंबईने गमावलेले सर्वाधिक सामने
९ सामने- आयपीएल २०२२*
८ सामने- आयपीएल २००९
८ सामने- आयपीएल २०१८
८ सामने- आयपीएल २०१४
७ सामने- आयपीएल २०२१
७ सामने- आयपीएल २०१६
७ सामने- आयपीएल २०१२
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा विराट कोहलीला सल्ला; म्हणाला, ‘काही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त…’
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण