आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमने त्यांचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरचे समर्थन केले आहे. वेंकटेश अय्यरने मागच्या हंगामात केकेआरला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले होते. या हंगामात मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. केकेआरने त्याला काही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढले होते.
मागच्या हंगामात वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने केलेले प्रदर्शन खरोखर अप्रतिम होते आणि याच कारणास्तव केकेआरने त्याला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन केले होते. परंतु चालू हंगामात त्याने फ्रँचायझीच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. सलामीवीराच्या रुपात सुरुवातीच्या सात सामन्यांमध्ये त्याने अवघ्या १०९ धावा केल्या होत्या. या निराशाजनक प्रदर्शनानंतर त्याला मध्यक्रमात खेळवले गेले, पण त्याठिकाणी देखील तो अपयशी ठरला. यानंतर अखेर फ्रँचायझीने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा निर्णय घेतला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brandon Macculam) वेंकटेशविषयी बोलताना म्हणाला की, “वेंकटेश अय्यरने या हंगामात तेवढ्या धावा केल्या नाहीत, जेवढ्या आम्हाला हव्या होत्या. याच कारणास्तव आम्हाला काही इतर पर्यायांकडे पाहावे लागले. हे एखाद्या अश्या व्यक्तीसाठी निराशाजनक आहे, ज्याने मागच्या सात-आठ महिन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.”
“हे वेंकटेशचे दुसरे वर्ष आहे आणि संघांनी त्याच्याविषयी थोडा अधिक होमवर्क केला आहे. हे या स्पर्धेसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. याच कारणास्तव त्याला मागच्या हंगामात मिळालेले यश या हंगामात पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवता येत नाहीये,” असे मॅक्युलम म्हणाला.
वेंकटेश अय्यर आयपीएल २०२२मध्ये फलंदाजीसोबतच गोलंदाजीत देखील अपयशी ठरला आहे. त्याने या हंगामात फक्त तीन षटके गोलंदाजी केली आहे आणि यामध्ये १२च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. मागच्या हंगामात वेंकटेशने १० सामने खेळले होते आणि यामध्ये ३७० धावांचे योगदान दिले होते. याच पार्श्वभूमीवर मॅक्युलमला असेही वाटते की, वेंकटेशला या हंगामात अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत.
मात्र, सोमवारी (दि. ०९ मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने पुन्हा एकदा वेंकटेश अय्यरवर विश्वास दाखवत त्याला सलामीला खेळवले. या सामन्यात तो तुफान फॉर्ममध्ये खेळताना दिसला. त्याने यावेळी २४ चेंडूत ४३ धावा चोपल्या. यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीन सामन्यात सपशेल फ्लॉप झाल्यानंतर पॉवेलने थेट आपल्याच बॅटला दिलेली धमकी, म्हणाला होता…
पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज