---Advertisement---

धोनीने कर्णधारपद सोडताच रोहितची भावूक पोस्ट, पाहून वाढेल हिटमॅनबद्दलचा आदर

---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या काही तास आधी अनेक उलथापालथ झालेल्या पहायला मिळाल्या आहेत. तसेच यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मध्ये होणार आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सप्रमाणेच महेंद्रसिंह धोनी याच्याकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला दिली आहे. यानंतर सोशल मिडियावर मोठी खळबळ उडाली होती.

याबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील इंन्स्टा स्टोरी टाकून धोनी बद्दल आदर व्यक्त केला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीने प्रमाणेच रोहित शर्मा देखील आयपीएल इतिहातील सर्वाधीक ट्रॉफी जिंकणार कर्णधार आहे. अशातच आयपीएलच्या 17व्या हंगामात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसून ते फक्त एक खेळाडू म्हणून या हंगामात खेळताना दिसणार आहेत. यामुळे एकंदरीत काहीही असलं तर धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीने ही जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते.

धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले होते.

दरम्यान, ऋतुराज गायकवाड आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने 1797 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 14 अर्धशकांचा समावेश आहे.

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुढीलप्रमाणे : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, एन सिमरंत, एन. सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली. जखमी/माघार घेतलेले खेळाडू: डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---