एमएस धोनी यापुढे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार नसेल. गुरुवारी (21 मार्च) सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड त्यांच्या संघाचा नवा कर्णधार असल्याचे स्पष्ट झाले. सीएएसके आणि धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सने देखील रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्याला याला संघाचे कर्णधारपद सोपवले. त्याचसोबत विराट कोहली मागच्या दोन आयपीएल हंगामांपासून आरसीबीचा कर्णधार नाहीये.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये एमएस धोनी (MS Dhoni) ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) याच्या नेतृत्वात खेळमार आहे. तर रोहित शर्मा हार्दिक पंड्या कर्णधार असणाऱ्या मुंबईसाठी केवळ खेळाडू म्हणून खेळे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण विराटने देखील मागच्या दोन हंगामांमध्ये फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वात आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. विराटला कर्णधार म्हणून आरसीबीसाठी एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. पण रोहित आणि धोनी मात्र आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार राहिले आहेत. दोघांच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी 5-5 आयपीएल ट्रॉफी आहेत. असे असले तरी धोनी आणि रोहितला एकाच आयपीएल हंगामात कर्णधारपद सोडावे लागले. आगामी हंगामात विराटनंतर धोनी आणि रोहितकडून संघाचे कर्णधारपद जाणार, यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
धोनीने सीएसकेचे कर्णधारपद –
तसे पाहिले तर कर्णधार म्हणून धोनीने टी20 फॉरमॅटमध्ये 2007 साली खेळायला सुरुवात केली. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 विश्वचषकाचा पहिलाच हंगाम जिंकला आणि युवा भारतीय संघाची चर्चा जगभरात झाली. पुढे धोनीच्याच नेतृत्वात भारताने 2011 साली वनडे विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2020 मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण आयपीएलमध्ये तो अजूनही खेळत आहे. रोहित शर्मानंतर धोनी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा केवळ दुसरा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली. पण यापूढे कर्णधार म्हणून धोनी कधीच खेळणार नाही. कदाचित हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. आयपीएल 2024 अवघ्या 24 तासांचा वेळ बाकी असताना ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार असल्याची माहिती चाहत्यांना मिळाली.
रोहितच्या कर्णधारपदामुळे वाद –
रोहित शर्मा आयपीएलमध्ये आपल्या संघाला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा पहिला कर्णधार आहे. 2013 मध्ये त्याने मुंबईसाठी पहिला सामना कर्णधार म्हणून खेळला. कर्णधार बनल्यानंतर पहिल्याच हंगामात रोहितने मुंबईला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. साल 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या पाच हंगामात रोहितच्याच नेतृत्वात मुंबईने विजेतेपद पटकावले. असे असले तरी, आयपीएल 2024च्या लिलिवापूर्वी मुंबई फ्रँचायझीने असा एक निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
आगामी आयपीएल हंगामासाठी मुंभई इंडियन्सरे रोहितच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले. संघाच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पण चाहत्यांना हे जराही पडल्याचे दिसत नाही. रोहित मागच्या दोन वर्षांपासून भारताचे नेतृत्व देखील करत आहे. 2021 मध्ये विराट कोहलीने एकापाठोपाठ तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहितकडे भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात रोहितने भारतासाठीही आपले नेतृत्वगुण दाखवले आणि महत्वाच्या मालिका जिंकल्या.
विराट कोहलीही कर्णधार नाही –
कर्णधार म्हणून विराट कोहलीचा प्रवास देखील आठवणीत राहण्यासारखा आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. पण सचिन तेंडुलकर याच्यानंतर कदाचित विराटच भारताचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वात आरसीबीला जगभरात ओळख निर्माण करता आली. विराटच्या नावावर असणारे अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. पण कर्णधार म्हणून त्याला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. 2019 नंतर पुढचे दोन वर्ष विराटसाठी खडतर राहिले. दरम्यानच्या काळात त्याला धावा करण्यासाठी झगडावे लागले. याच कारणास्तव त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. 2021 मध्ये त्याने एक-एक करून भारतासाठी तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. मागच्या दोन हंगामांमध्ये फाफ डू प्लेसिस आरसीबीचा कर्णधार आहे आणि विराट त्याच्या नेतृत्वात खेळतो. (End of Champions Era! Neither Dhoni.. nor Rohit.. nor Virat, young players became captains of IPL teams)
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत धोनी सोडून सीएसकेचे नेतृत्व करणारे खेळाडू, ऋतुराजचा नंबर कितवा?
BREAKING । थालाच्या चाहत्यांचं हर्टब्रेक! ऋतुराज बनला सीएसकेचा नवा कर्णधार