मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जगभर दिसत आहे. सर्वात असे व्यस्त असलेले दुबईचे विमानतळ अचानक बंद झाल्याने हजारो नागरिक तेथे अडकले आहे. त्यामध्ये भारताची बॅडमिंटन पीव्ही सिंधूचा समावेश आहे. दुसरीकडे अबू धाबीमध्ये सुरक्षा अर्लट आणि मिलाईल्सच्या (क्षेपणास्त्र) हल्ल्यांमुळे इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) एक स्टार खेळाडू अडकला आहे.
या युद्धामुळे क्रिकेटवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान ए आणि इंग्लंड लायन्समध्ये एक मार्चला ५० षटकांचा दुसरा सामना खेळला जाणार होता. आता तो रद्द करण्यात आला असल्याने संघासोबत अनेक खेळाडू तेथे अडकलेले आहेत. जॉनी बेयरस्टो सध्या अबू धाबीमध्ये इंग्लंड लायन्स संघासोबत आहे. तो संघात कोचिंग आणि मेंटरची भुमिका पार पाडत आहे. यामुळे त्याने युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची विनंती केली आहे.
इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांनतर युकेचे पंतप्रधान स्टारमर यांनी सोशल मिडियामार्फत त्यांचे वक्तव्य सादर केले होते. बेरयस्टोने त्यालाच रिप्लाय दिला आहे. त्याने म्हटले, “तुम्ही आम्हाला घरी पोहचवू शकता का?”
इंग्लंडचा संघ सध्या अबू धाबीमध्ये असून तेथे धमाके सुरू आहेत. त्यामुळे संघ आणि सपोर्ट-स्टाफमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने शनिवारी (२८ फेब्रुवारी) अधिकृत विधान जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, “आमचे संघ आणि स्टाफ यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. आम्ही त्यासाठी सरकार आणि सुरक्षेचे विशेषज्ञ यांच्या संपर्कात आहोत.”
पाकिस्तान ए आणि इंग्लंड लायन्समध्ये तीन टी२० आणि ५ वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यामध्ये इंग्लंजने तिन्ही टी२० आणि पहिला वनडे सामना जिंकला आहे.
अबू धाबीच्या अल धाफरा या विमानतळाचा वापर युएई आणि अमेरिकीचे एयर फोर्स करत आहे. तसेच दुबईच्या जेबेल अली पोर्टमध्ये अमेरिकेच्या नौसेना दलाचा तळ आहे. तेथे अमेरिकी एयरक्राफ्ट कॅरियर आणि अन्य नौसैनिक जहाजे आहेत. जे इराणच्या निशान्यावर आहे.






