पुणे:बारामती लॉन टेनिस क्लबच्या वतीने आयोजित व प्रविण मसालेवाले प्रायोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धेच्या पहिल्या मालिकेत मुलांच्या गटात पुण्याच्या अधिराज दुधाने याने तर, मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
बारामती क्लब टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित अधिराज दुधाने याने दुसऱ्या मानांकित आरव छल्लानीचा 4-2, 4-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अधिराज हा न्यू इंडिया शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून रोहित शिंदे टेनिस अकादमीत प्रशिक्षक रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत पुण्याच्या अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशी हिने दुसऱ्या मानांकित मायरा शेखचा 4-1, 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सृष्टी हि केंद्रीय विद्यालय शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून इंटेंसिटी स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षक कपिल किन्नरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तिचे हे या वर्षातील पाचवे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बारामती लॉन टेनिस क्लबचे सचिव दत्तात्रय बोऱ्हाडे, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धैर्यशील तावरे, संदीप बेल्लूडी, एमएसएलटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी:
अधिराज दुधाने[1]वि.वि.आरव बेले[3] 6-3;
आरव छल्लानी[2]वि.वि.प्रणव गायकवाड 6-2;
अंतिम फेरी: अधिराज दुधाने[1]वि.वि.आरव छल्लानी[2] 4-2, 4-1;
मुली: उपांत्य फेरी:
सृष्टी सूर्यवंशी[1]वि.वि.त्रिशा भोसले[3] 6-1;
मायरा शेख[2]वि.वि.हर्षा देशपांडे 6-3;
अंतिम फेरी: सृष्टी सूर्यवंशी[1]वि.वि.मायरा शेख[2] 4-1, 4-0.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट खाताना दिसला धोनी, असे का करतो थाला? घ्या जाणून
पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video