पुणे, 13 मार्च 2024: केरळ हॉकीवर 10-0 असा सहज विजय मिळवत हॉकी महाराष्ट्रने 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली. सर्वाधिक 4 गोल करताना ऋतुजा पिसाळ हिने विजयात मोठा वाटा उचलला. राज्य असो किंवा देशातर्फे खेळताना गोल करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या ऋतुजाने विजयी सलामीबद्दल समाधान व्यक्त करतानाच, माझ्या प्रयत्नांमुळे सर्वांचे समाधान झाले याचा मोठा आनंद झाल्याचे म्हटले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळला गेलेला सामना उपविजेत्या हॉकी महाराष्ट्रासाठी निःसंशयपणे खूप महत्वपूर्ण होताच. परंतु, २१ वर्षीय ऋतुजासाठी, तिने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या अशाच कामगिरीच्या तुलनेचच हा क्षण होता.
ओमानमध्ये जानेवारी 2024 मध्ये झालेल्या एफआयएच वर्ल्ड फाइव्हज महिला विश्वचषक स्पर्धेत ऋतुजाने चार गोल करताना उपांत्यपूर्व फेरीत भारताला न्यूझीलंडवर 11-1 असा मोठा विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. तो तिच्या करिअरमधील सर्वोत्तम क्षण आहे.
हॉकी महाराष्ट्रसाठी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतानाचा अनुभव विचारला असता, “मी म्हणेन की दोन्ही सामने खूप मोठे आणि तितकेच समाधान देणारे आहेत. भारतासाठी खेळणे हा एक मोठा सन्मान आहे. त्यातच गोल (स्कोअर) करणे हे स्वतः सह अन्य सहकाऱ्यांसाठी आनंदाचे क्षण आहेत. हॉकी महाराष्ट्रकडून खेळताना गोल केल्याचा मोठा आनंद आहे. त्यामुळे सहकारी, चाहते यांना आनंदी राहण्यात आणि संघाचा कायमचा ठसा उमटवण्यास मदत करू शकले.”
भारतासह हॉकी महाराष्ट्रासाठी किंवा कोणत्याही संघासाठी गोल करणे हा संस्मरणीय क्षण असल्याचे ऋतुजाने स्पष्ट केले. हॉकी केरळविरुद्धच्या मोठ्या विजयाबाबत रुतुजा म्हणाली की, कमीत कमी आठ गोलच्या फरकाने जिंकण्याचे लक्ष्य होते.
” पहिल्या हाफमध्ये गोल केल्यानंतर आम्ही आमचे लक्ष्य बदलले आणि त्यामुळे मोठ्या फरकाने आम्ही सामना संपवला.”
मोठया फरकाच्या विजयानंतर प्रेक्षकांनी जल्लोष केला. त्याबाबत ऋतुजा म्हणाली, की तिच्या कुटुंबाने सलामीचा सामना ऑनलाइन पाहिला. “ते बाद फेरी किंवा अंतिम टप्प्यात सामने पाहायला मैदानावर येतील. त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि खेळताना आपले कुणीतरी सपोर्ट करत असल्याने आत्मविश्वास दुप्पट वाढतो. त्यामुळे आपले कुटुंब आजूबाजूला असताना खेळण्याचा वेगळा आनंद आहे.”
प्रत्यक्ष मैदानावर, हॉकी महाराष्ट्राने चांगलीच चमक दाखवली, पहिल्या हाफमध्ये पेनल्टी कॉर्नरवर तीन गोल करताना बी ग्रुपमधील पहिल्या सामन्यात तीन गुण वसूल केले. प्रियांका वानखेडेने चौथ्या मिनिटाला मिळालेल्या महाराष्ट्राचे गोल खाते उघडले. अक्षता ढेकळे हिने आठव्या आणि ऋतुजा पिसाळने (18व्या मिनिटाला) दहा मिनिटांच्या फरकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे आणखी त्यात भर घातली. दुर्गा शिंदे (20व्या) आणि भावना खाडे यांनी (26व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून पहिल्या हाफमध्ये 5-0 अशी मोठी आघाडी घेतली.
एंड बदलल्यानंतर हॉकी महाराष्ट्रने आणखी चार गोलांची भर घातली. ऋतुजा पिसाळने (४४वे, ५३वे, ५८व्या मिनिटाला) तीन, तर वैष्णवी (४६व्या मिनिटाला) आणि योगिता बोराने (५१ व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करून आरामात विजय मिळवला.
निकाल: बी ग्रुप: हॉकी महाराष्ट्र: 10 (प्रियांका वानखेडे चौथ्या मिनिटाला, अक्षता ढेकळे आठव्या मिनिटाला पीसी., ऋतुजा पिसाळ 18व्या. मिनिटाला पीसी., 44व्या, 53व्या, 58व्या मिनिटाला; दुर्गा शिंदे 20व्या; भावना खाडे 26व्या पीसी.; वैष्णवी फाळके 46व्या मिनिटाला, योगिता बोरा ५१व्या मिनिटाला); विजयी वि. केरळ हॉकी: 0. हाफटाईम: 5-0.
महत्वाच्या बातम्या –
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पालघर संघाचा सलग दुसरा विजय
धाराशिव संघाचा पराभव करत नाशिक संघाने मिळवला पहिला विजय