---Advertisement---

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पालघर संघाचा सलग दुसरा विजय

---Advertisement---

पुणे (13 मार्च 2024) – आजच्या दिवसाची दुसरी लढत पालघर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाली. कोल्हापूरच्या ओमकार पाटीलची पहिल्याच चढाईत प्रेम मंडळ ने पकड करत संघाचा खात उघडला. तर पालघरच्या पहिल्या चढाईत यश निंबाळकर ने 2 गुण मिळवत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाच्या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळाचा प्रदर्शन करत सामन्यात चुरस आणली होती.

कोल्हापूर संघ 7-10 असा पिछाडीवर असताना कोल्हापूर संघाने मध्यंतरापुर्वी जोरदार पलटवार करत सामन्यात आघाडी आणली. पालघर संघाला ऑल आऊट करत 15-11 अशी आघाडी मिळवली. कोल्हापूर कडून दादासो पुजारी ने उत्कृष्ट पकडीचा खेळ केला तर सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी चढाईत गुण मिळवले. मध्यंतरा नंतर सामना अत्यंत चुरशीचा झाला.

सामन्याची शेवटची 8 मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत सामन्यात 21-19 अशी आघाडी मिळवली. पालघरच्या यश निंबाळकर सुपर टेन पूर्ण करत संघाला आघाडी मिळून दिली. त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवत पालघर संघाने 27-22 असा विजय मिळवला. पालघर कडून यश निंबाळकर ने चढाईत 12 गुण मिळवले तर जीत पाटील ने 6 पकडीत गुण मिळवले.

बेस्ट रेडर- यश निंबाळकर, पालघर
बेस्ट डिफेंडर- जीत पाटील, पालघर
कबड्डी का कमाल- चंद्रकांत जगताप, कोल्हापूर

महत्वाच्या बातम्या – 
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप
मुंबईपाठोपाठ या दोन संघांनी जिंकले आहेत सर्वाधिक रणजी करंडक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---