पुणे (13 मार्च 2024) – आजचा चौथा सामना धाराशिव विरुद्ध नाशिक संघ यांच्यात झाला. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला होता. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत होते. नाशिक संघाने आक्रमक सुरुवात करत सामन्यावर पकड केली. नाशिकच्या ईश्वर पाथाडे ने चपळाई खेळ करत गुण मिळवले.
सिद्धांत संदनशिव व शशिकांत बरकांड यांनी उत्कृष्ट पकडी करत संघांची आघाडी वाढवली. मध्यंतरापूर्वी नाशिक संघाने धाराशिव संघाला ऑल आऊट करत 20-10 अशी आघाडी घेतली होती. नाशिक संघाने मध्यंतरा नंतर आपला आक्रमक प्रवित्रा कायम ठेवत सामन्यावर पकड मजबूत केली. ईश्वर पाथाडे सुपर टेन पूर्ण केला.
नाशिक संघाने 51-19 असा विजय मिळवला. ईश्वर पाथाडे ने सर्वाधिक 16 गुण मिळवले. नाशिकच्या गणेश गीते ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले चढाईत 4 तर पकडीत 4 गुण मिळवले. सिद्धांत संदनशिव हाय फाय पूर्ण केला. धाराशिवच्या रवी धुमाळ ने 7 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- ईश्वर पाथाडे, नाशिक
बेस्ट डिफेंडर- सिद्धांत संदनशिव, नाशिक
कबड्डी का कमाल- अभिजित देवरे, धाराशिव
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । मुंबईच्या योद्धा क्रिकेटमधून निवृत्त! हिटमॅनची धवल कुलकर्णीसाठी खास पोस्ट
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप