पुणे (14 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज पहिली लढत पालघर विरुध्द सांगली यांच्यात झाली. पालघर संघ दोन विजयासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. तर सांगली ने 2 पैकी 1 सामना जिंकला होता. पालघरच्या पहिल्या चढाईतच यश निंबाळकरची नवाज देसाई ने पकड करत संघाचा खात उघडला. तर पुढील चढाईत तुषार खडके ने गुण मिळवला.
सांगलीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सहाव्या मिनिटाला पालघर संघाला ऑल आऊट करत 9-2 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पालघरच्या प्रतिक जाधव ने सुपर रेड करत सामन्यात चुरस आणली होती. प्रतिक जाधव ने सांगली संघाला चांगला प्रतिकार दिला. सांगलीच्या अभिराज पवार व अभिषेक गुंगे यांनी चतुरस्त्र चढाया करत आपल्या संघाची आघाडी कायम ठेवली. मध्यंतराला सांगली संघाकडे 17-14 अशी आघाडी होती.
मध्यंतरानंतर सामना चांगला चुरशीचा झाला. मात्र सांगली संघाने शेवट पर्यत आपली कायम ठेवली होती. सांगली ने 40-34 असा विजय मिळवला. सांगलीच्या अभिषेक गुंगे ने अष्टपैलू खेळ करत 12 गुण मिळवले. अभिराज पवार ने चढाईत 7 गुण मिळवले. तर सांगलीच्या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अभिषेक गुंगे ने पकडीत 5 गुण मिळवले तर इतर 5 बचवापटूंनी प्रत्येकी 2 पकडीत गुण मिळवले. पालघर कडून प्रतिक जाधव ने सर्वाधिक 11 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- अभिषेक गुंगे, सांगली
कबड्डी का कमाल- अभिषेक गुंगे, सांगली
महत्वाच्या बातम्या –
हॉकी महाराष्ट्रची विजयी सलामी, सीनियर राष्ट्रीय महिला हॉकी; ऋतुजा पिसाळचे चार गोल;
विजयानंतर मैदानात मन भरून नाचला श्रेयस अय्यर, मुंबईला 42वी Ranji Trophy जिंकण्यासाठी केली मदत