मुंबईचे खेळाडू गुरुवारी विदर्भला पराभूत करून रणजी ट्रॉफी 2024चा विजेते ठरले. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील मुंबईने यावेळी 42वी रणजी ट्रॉफी जिंकली. या विजयासाठी संघातील प्रत्येकाचे योगदान मोलाचे राहिले. संपूर्ण हंगामात अपयशी ठरलेला अजिंक्य रहाणे देखील अंतिम सामन्यात चमकला. त्याचसोबत मध्यक्रमातील श्रेयस अय्यर यानेही चांगली कामगिरी केली. विजयानंतर श्रेयस अय्यर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई आणि विदर्भ (Mumbai Vs Vidarbha) यांच्यातील रणजी ट्रॉफी 2024चा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. रविवारी (10 मार्च) सुरू झालेला हा सामना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी संपला. नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या डावात यजमान मुंबईने 224, तर पाहुण्या विदर्भ संघाने 105 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावात मुंबई संघ आघाडीवर होता आमि त्यांनी 418 धावा कुटल्या. विजयासाठी शेवटच्या डावात विदर्भला 538 धावा होव्या होत्या. पण 368 धावा करून विदर्भ सर्वबाद झाला.
मुंबईला मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय संघातील फलंदाज आणि गोलंदाज दोन्हींना जाते. मध्यक्रमातील श्रेयस अय्यर पहिल्या डावात 7 धावा करून बाद झाला. पण दुसऱ्या डावात त्याने 95 धावांची अप्रतिम खेळी केली. या 10 चौकार आणि 3 षटकार समील होते. या महत्वापूर्ण धावांचे योगदान दिल्यानंतर श्रेयस अय्यर विजयाचा पूर्ण आनंद लुटताना दिसला. व्हायरल व्हिडिओत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. मैदानात ढोल-ताशे वाजत आहेत. अय्यर देखील याच आवाजात बेधुंद झाल्याचे दिसले. अय्यर डाव्या हाताने ढोल वाजवण्याची ऍक्शन करत होता. हा व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे.
Shreyas Iyer dancing and celebrating after won the Ranji Trophy 2024.
– This is beautiful. 👌pic.twitter.com/pRzsV9lBHD
— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 14, 2024
दरम्यान, बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी खेळाडूंचे करार घोषित केले. देशांतर्गत क्रिकेट खेळत नसलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयने चालू वर्षासाठी राष्ट्रीय संघाच्या करारातून वगळले. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर श्रेयस अय्यरने मुंबईसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने अवघ्या 3 धावा केल्या होत्या. पण पण अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात महत्वपूर्ण खेळी केली. आगामी आयपीएल हंगामात अय्यर कोलकाता नाईट रायडर्ससाठी कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. (Shreyas Iyer danced his heart out after Mumbai won the Ranji Trophy)
महत्वाच्या बातम्या –
युवा कबड्डी सिरीज मध्ये पालघर, नंदुरबार संघाचा सलग दुसरा विजय
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये सांगली संघाची लातूर संघावर मात