पुणे (14 मार्च 2024) – आजचा तिसरा सामना सातारा जिल्हा विरुध्द कोल्हापूर जिल्हा यांच्यात झाला. कोल्हापूरच्या चढाईटपटूंनी आक्रमक खेळ करत पहिल्या पाच मिनिटातच सातारा संघाला ऑल आऊट केले. ओमकार पाटील व चंद्रकांत जगताप यांनी चपळाईने खेळ करत गुण मिळवले. कोल्हापूर ने मध्यंतरापूर्वी सातारा संघाला 2 वेळा ऑल आऊट केले होते.
मध्यंतराला कोल्हापूर संघाने 24-11 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरा नंतर सातारा संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट आपल्या संघाची पिछाडी कमी केली. त्यानंतर मात्र कोल्हापूर संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत सामन्यावर पकड मजबूत केली. ओमकार पाटील ने सुपर टेन पूर्ण केला. साईप्रसाद व दादासो पुजारी ने उत्कृष्ट पकडी केल्या.
कोल्हापूर संघाने 47- 24 असा विजय मिळवत स्पर्धेतील 2 दुसरा विजय मिळवला. कोल्हापूर कडून ओमकार पाटील ने चढाईत 15 गुण मिळवले. चंद्रकांत जगताप ने सुद्धा 7 गुण मिळवत ओमकार ला चांगली साथ दिली. तर दादासो पुजारी पुन्हा एकदा 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. साईप्रसाद ने 4 पकडी केल्या. (Kolhapur team’s second win in Yuva Kabaddi series)
बेस्ट रेडर- ओमकार पाटील, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – गणेश आवळे, सातारा
महत्वाच्या बातम्या –
विजयानंतर मैदानात मन भरून नाचला श्रेयस अय्यर, मुंबईला 42वी Ranji Trophy जिंकण्यासाठी केली मदत
हॉकी महाराष्ट्रची विजयी सलामी, सीनियर राष्ट्रीय महिला हॉकी; ऋतुजा पिसाळचे चार गोल;