Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज

पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार 'हा' गोलंदाज

May 9, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Kuldeep-Yadav

Photo Courtesy: iplt20.com


आयपीएलचा १५वा हंगाम दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत चालला आहे. हंगामातील साखळी फेरीचे सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत आणि प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होऊ लागले आहे. चाहत्यांना प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतात, याची जशी उत्सुकता लागली आहे, तशीच उत्सुकता पर्पल कॅपविषयी देखील आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी (८ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडर सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्यांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. चला तर या यादीवर एक नजर टाकूया.

राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याकडे सध्या पर्पल कॅप (Purple Cap) आहे. चहलने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये २२ म्हणजेच प्रत्येक सामन्यात २ अशा सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने या सामन्यात १८ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. हसरंगाने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २१ विकेट्स नावावर केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आहे. पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रबाडाने हंगामात आतापर्यंत १८ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला रविवारच्या डबल हेडरनंतर चांगलाच फटका बसला आहे.

रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) एकही विकेट घेऊ शकला नाही आणि तो थेट चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यामध्ये कुलदीपने १८ खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने (T Natarajan) हंगामात आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो पर्पल कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे पहिले पाच गोलंदाज
२२ विकेट्स – युजवेंद्र चहल

२१ विकेट्स – वानिंदू हसरंगा
१८ विकेट्स – कागिसो रबाडा
१८ विकेट्स – कुलदीप यादव
१७ विकेट्स – टी नटराजन

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या- 

‘टी२०त १५७च्या वेगाला काही किंमत नसते’, उमरान मलिकवर शास्त्रींचा जोरदार निशाणा

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत अधिराज दुधाने, सृष्टी सूर्यवंशी यांना विजेतेपद

‘तो’ काय सुपरमॅन नाहीये, जो नेहमीच विजय मिळवून देईल, म्हणत शास्त्रींची कोलकाता संघावर आगपाखड


ADVERTISEMENT
Next Post
Rovman-Powell

तीन सामन्यात सपशेल फ्लॉप झाल्यानंतर पॉवेलने थेट आपल्याच बॅटला दिलेली धमकी, म्हणाला होता...

MS-Dhoni

आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ब्रावोला धोनीचा टोमणा; म्हणाला, '...ओल्ड मॅन'

Suryakumar-Yadav

ब्रेकिंग! कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच मुंबईला मोठा झटका; सुपर फॉर्मात असलेला खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.