इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचाही दबदबा दिसून येत आहे. खासकरून राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी विशेष चमक दाखवली आहे. कुलचा नावाने ओळखली जाणारी ही जोडी पर्पल कॅपच्या शर्यतीत एकमेकांना टक्कर देताना दिसत आहे.
गुरुवारी (२८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR vs DC) झालेल्या हंगामातील ४१व्या सामन्यात पुन्हा एकदा कुलदीपने (Kuldeep Yadav) धडाकेबाज गोलंदाजी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने चहलसोबतच्या (Yuzvendra Chahal) पर्पल कॅपच्या शर्यतीबाबत (Purple Cap race) मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
कोलकाताविरुद्ध ३ षटके गोलंदाजी करताना कुलदीपने केवळ १४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक बाबा इंद्रजित, सुनिल नारायण आणि आंद्रे रसेल यांच्या त्याने विकेट घेतल्या. या ४ विकेट्ससह तो पर्पल कॅपच्या (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्याला मिळणारी कॅप) शर्यतीत चहलच्या नजीक पोहोचला आहे. त्याच्या खात्यात ८ सामने खेळताना १७ विकेट्सची नोंद आहे. तर चहल कुलदीपपेक्षा एका विकेटने पुढे आहे. त्याच्या खात्यात ८ सामन्यांमध्ये १८ विकेट्स आहेत.
कोलकाताविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर कुलदीपला पर्पल कॅपच्या शर्यतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कुलदीप म्हणाला की, “माझ्या आणि चहलच्या मध्ये कसलीही प्रतिस्पर्धा नाही. चहलने मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मी जेव्हा दुखापतग्रस्त होतो, तेव्हाही त्याने माझी साथ दिली आहे. मी अगदी मनापासून आशा करतो की, चहलने पर्पल कॅप जिंकावी. कारण गेल्या ४ वर्षांमध्ये त्याने अतिशय प्रशंसनीय गोलंदाजी केली आहे”.
दरम्यान कुलचा जोडीने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखवत टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुनिल नारायणने रचला इतिहास, दिल्लीची एकमेव विकेट घेत पूर्ण केले खास ‘दीडशतक’
भाभी आई, लक लाई! दिल्ली कॅपिटल्सला चीयर करायला आली पंतची गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा