Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनिल नारायणने रचला इतिहास, दिल्लीची एकमेव विकेट घेत पूर्ण केले खास ‘दीडशतक’

सुनिल नारायणने रचला इतिहास, दिल्लीची एकमेव विकेट घेत पूर्ण केले खास 'दीडशतक'

April 29, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Sunil-Narine

Photo Courtesy: iplt20.com


गुरुवारी (२८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२मधील ४१व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला ४ विकेट्स राखून पराभूत केले आहे. भलेही कोलकाताने हा सामना गमावला असला तरीही, त्यांचा फिरकीपटू सुनिल नारायण याने या सामन्यादरम्यान मोठा किर्तीमान केला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध फक्त १ विकेट घेतली आणि ही एकच विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली आहे. त्याने या एका विकेटसह आपल्या आयपीएलमधील १५० विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. यासह त्याने इतिहासालाही गवसणी घातली आहे.

नारायणने (Sunil Narine) दिल्ली संघाचा फलंदाज ललित यादवला (Lalit Yadav) २२ धावांवर पायचित केले होते. ललितची ही सामन्यातील एकमेव विकेट नारायणसाठी विक्रमी ठरली आहे. ही त्याची आयपीएलमधील १५० वी (150 IPL Wickets) विकेट होती. यासह तो आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेणारा पहिलाच परदेशी फिरकीपटू (First Overseas Player) ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये १५० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज बनला आहे. ही कामगिरी करणारा तो सहावा फिरकीपटूही बनला आहे. याबाबतीत त्याने हरभजन सिंगची (Harbhajan Singh) बरोबरी केली आहे. हरभजननेही १६३ आयपीएल सामने खेळताना १५० विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स (Most Wickets In IPL) घेण्याच्या विक्रमात ड्वेन ब्रावो अव्वलस्थानी आहे. त्याने १५९ सामने खेळताना सर्वाधिक १८१ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याच्यानंतर लसिथ मलिंगा १२२ सामन्यांमध्ये १७० विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमित मिश्रा १५४ सामन्यांमध्ये १६६ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पियुष चावला व आयपीएलच्या चालू हंगामात धुमाकूळ घालत असलेला युझवेंद्र चहल संयुक्तपणे चौथ्या क्रमाकांवर आहेत. दोघांच्याही खात्यात १५७ विकेट्सची नोंद आहे. त्यानंतर आर अश्विन १५२ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमारच्या खात्यात १५१ विकेट्स असून तो सहाव्या क्रमांकावर आहे.

सुनिल नारायणचे चालू हंगामातील प्रदर्शन
दरम्यान नारायणच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने ९ सामने खेळताना ७ विकेट्स घेतल्या आहेत. ५.३०च्या इकोनॉमी रेटने त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान २१ धावांवर २ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भाभी आई, लक लाई! दिल्ली कॅपिटल्सला चीयर करायला आली पंतची गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या उमरानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एके दिवशी…’


ADVERTISEMENT
Next Post
Kuldeep-Yadav

मैत्री असावी तर 'कुलचा' सारखी! चहलसोबतच्या पर्पल कॅपच्या शर्यतीबाबत कुलदीपची मन जिंकणारी प्रतिक्रिया

Chetan-Sakariya-Celebration

पहिल्याच षटकात फिंचला क्लिन बोल्ड केल्यानंतर सकारियाचे 'गोकू स्टाईल' सेलिब्रेशन

Rishabh-Pant-And-Shreyas-Iyer

धोनीचा शिष्य शोभतोय! पंतने अवघड कॅच घेत कोलकाताच्या कर्णधाराला धाडले तंबूत; त्यालाही बसेना विश्वास

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.