ऋषभ पंतनं आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे. तो आज बऱ्याच दिवसांनी दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत दिसला.
दिल्ली कॅपिटल्सनं सोशल मीडियावर पंतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात पंत फलंदाजी करताना दिसत आहे. ऋषभनं मे 2022 मध्ये दिल्लीसाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर कार अपघातामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं नुकतंच पंतला तंदुरुस्त घोषित केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो दिल्लीच्या निळ्या जर्सीमध्ये सराव करताना दिसत आहे. पंतच्या शॉटचा फोटो पाहता तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. तो आज नेटमध्ये सराव करत होता. दिल्ली कॅपिटल्सनं कॅप्शनमध्ये सांगितलं की, ऋषभ पंत तब्बल 662 दिवसांनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत दिसला. पंतच्या या अवघ्या एका तासात तब्बल 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचप्रमाणे या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
Instagram पर यह पोस्ट देखें
ऋषभ पंतनं 21 मे 2022 रोजी दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचा सामना खेळला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात त्यानं 33 चेंडूंचा सामना करत 39 धावा केल्या होत्या. ऋषभच्या या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. मुंबईनं 160 धावांचं लक्ष 5 विकेट्स गमावून गाठलं होतं.
ऋषभ पंतचा आयपीएलमधील एकूण रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले. या कालावधीत त्यानं 2838 धावा केल्या आहेत. पंतनं या काळात 1 शतक आणि 15 अर्धशतकंही झळकावली आहेत. अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्स पंतकडे संघाचं कर्णधारपदही सोपवू शकते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीबीसीआयनं ऋषभ पंतवर एक सीरीज बनवली आहे. ‘मिरॅकल मॅन’ असं या सीरीजचं नाव आहे. त्याचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यात आला. या मालिकेचा पहिला भाग गुरुवारी (14 मार्च) रिलीज होणार असल्याचं बोर्डानं सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मिरॅकल मॅन’! अपघातानंतर ऋषभ पंतच्या कमबॅकवर बीसीसीआयची डॉक्युमेंट्री, ‘या’ तारखेला होणार रिलीज
शाळेत मैत्री अन् पुढे प्रेमात रुपांतर! जाणून घ्या ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरची लव्हस्टोरी
रमजानचा उपवास सोडण्यासाठी क्रिकेट मॅच थांबवली, खेळाडूंनी मैदानावरच खाल्ला खजूर