---Advertisement---

पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल

---Advertisement---

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी20 सामन्यांची मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 22 जुलैला श्रीलंकेला रवाना झाला.

मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची ही पहिली मालिका आहे. गंभीर श्रीलंकेत पोहोचताच ॲक्शन मोडमध्ये आला असून बीसीसीआयनं यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गंभीर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, जिथे त्यानं 2 डावात अर्धशतकासह 70 धावा केल्या होत्या.

बीसीसीआयनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचं सराव सत्र दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये गौतम गंभीर संजू सॅमसनशी बोलताना दिसत आहे. सॅमसनची वनडे संघात निवड न झाल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत गंभीरनं त्याला फलंदाजीच्या टिप्स दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गौतम गंभीर सॅमसनला ऑफ साइडमध्ये खेळण्याच्या तंत्राबद्दल काहीतरी सांगत आहे.

 

29 वर्षीय संजू सॅमसनची टी20 संघात निवड झाली असली तरी रिषभ पंतच्या रूपानं टीममध्ये आधीच एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्सच्या या कर्णधाराला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.

सॅमसननं 2015 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र गेल्या 9 वर्षांत तो टीम इंडियासाठी केवळ 28 सामने खेळू शकला आहे. या 28 सामन्यांच्या 24 डावात त्यानं 444 धावा केल्या आहेत. सॅमसन 2017 पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात 300 हून अधिक धावा करत आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, पण भारतीय संघाकडून सतत संधी न मिळाल्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अद्याप भरारी घेऊ शकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार क्रिकेटपटू बाबा बागेश्वर धामच्या दर्शनाला, पाया पडून घेतला आशिर्वाद
मेगा लिलावापूर्वी हैदराबादचा प्लॅन ठरला, 150चा स्पीड असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला बसणार मोठा झटका!
‘किंग’ कोहलीनं क्रिकेटवर गाजवलंय वर्चस्व..! पण त्याची दहावीची मार्कशीट पाहून बसेल धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---