इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत जबरदस्त खेळ करताना सलग दोन सामन्यात शतके केली.
या मालिकेतील मंगळवारी(17 जुलै) तिसऱ्या सामन्यात रुटने शतक करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. यामुळे इंग्लंडने ही वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.
मात्र या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रुटने स्टँड-अप कॉमेडियन किंवा गायक ज्याप्रकारे माइक खाली फेकतात तसे बॅट खाली फेकत इंग्लंडचा विजय साजरा केला होता. त्यामुळे त्याच्या या सेलिब्रेशनवर बरीच टीका झाली.
मात्र आता त्याने या सेलिब्रेशनची लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, “ही अशी गोष्ट होती ज्याचा मला लगेचच पश्चाताप झाला. मी क्रिकेटमैदानावर केलेली ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट होती.”
तसेच रुटच्या या सेलिब्रेशनवर संघसहकाऱ्यांनी त्याला ट्रोल केले होते.
Root out. 👊 pic.twitter.com/VTv3KkUdJT
— England Cricket (@englandcricket) July 17, 2018
रुटने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत 14 जुलैला झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आणि 17 जुलैला झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अनुक्रमे नाबाद 113 आणि 100 धावा केल्या होत्या.
तसेच तो इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक शतके करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने वनडे कारकिर्दीत 13 शतके केली आहेत.
ICYMI, @root66 yesterday became England's leading ODI century-maker with his 13th in the format! 💯 #ENGvIND pic.twitter.com/31i1jZYBn9
— ICC (@ICC) July 18, 2018
रुट आता 1 आॅगस्टपासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसेल. या कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कसोटी संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचे भावुक ट्विट
–बीसीसीआयच्या वेबसाइटवर एमएस धोनीच आहे टीम इंडियाच्या कर्णधारपदी कायम!
–म्हणून अर्जुन तेंडुलकरला पाहुन झाली सचिनच्या वनडे पदार्पणाची आठवण