मुंबई। मंगळवारी पार पडलेल्या आयपीएल 2018 क्वालिफायर 1च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने हैद्रबाद सनरायझर्सचा 2 विकेट्सने पराभव करत सातव्यांदा आयपीएलच्या आंतिम फेरीत प्रवेश केला.
याबरोबरच या संघातील कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना हे खेेळाडू ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक वेळा आंतिम फेरी गाठणारे भारतीय खेळाडू ठरले आहेत.
या दोघांनीही ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत एकूण 13 वेळा आंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम केला आहे.
सर्वाधिक वेळा आंतिम फेरी गाठण्याच्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आर आश्विन आहे. त्याने 10 वेळा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये आंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
धोनी आणि रैना या खेळाडूंनी 13 पैकी 9 वेळा तर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतानाच अंतिम फेरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्य़ामध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक संघ सहभागी होतात अशा स्पर्धा, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग असे मिळुन हे खेळाडू तब्बल 13 अंतिम सामन्यात खेळले आहेत.
तसेच धोनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात आठव्यांदा खेळण्याचा मान मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
त्याने ज्या ११ आयपीएल खेळल्या त्यातील ९ चेन्नईकडून तर २ पुण्याकडून खेळल्या आहेत. त्यात २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये तो चेन्नईकडून फायनल खेळला आहे. तर २०१७मध्ये त्याने पुण्याकडून अंतिम फेरी गाठली होती.
सर्वाधिक वेळा टी२० फायनल खेळलेले भारतीय खेळाडू
१३- एमएस धोनी
१३- सुरेश रैना
१०- आर अश्विन#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat @thodkyaat— Sharad Bodage (@SharadBodage) May 23, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–मग गौतम गंभीचा गेम केला तरी कुणी?
-१९ पैकी चेन्नईच्या ८ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळाला सामनावीर पुरस्कार
–धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?
–चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग
–एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!
–एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम
–कॅप्टन कूल एमएस धोनीचा नाद करायचा नायं !