---Advertisement---

विस्फोटक फलंदाज मॅक्यूलमला मागे टाकत ‘या’ विक्रमात रोहितने केली विराटची बरोबरी

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 9:03 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा तेरावा सामना गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुबई येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली. यादरम्यान रोहित फलंदाजी करत असताना पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला होता. शमीच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने शानदार चौकार ठोकला. या चौकारासह रोहितने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

रोहित हा चौकार ठोकत आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे. असा कारनामा करण्याची ही त्याची १८वी वेळ होती. या विक्रमात त्याने न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्यूलमला मागे टाकले आहे. मॅक्यूलमने आतापर्यंत १७ वेळा आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार ठोकण्याचा कारनामा केला होता.

रोहित रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली (१८ वेळा) आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (१८ वेळा) यांच्यासह या विक्रमात संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

या यादीत किंग्स इलेव्हन संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा हे खेळाडू अव्वल क्रमांकावर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर प्रत्येकी १९ वेळा चौकार ठोकण्याचा कारनामा केला आहे.

यासोबतच रोहित आयपीएलमध्ये २०० चौकारांचा टप्पा पार करणारा खेळाडू ठरला आहे.

त्याने आतापर्यंत १९२ सामने खेळले आहेत.

आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक चौकार ठोकणारे खेळाडू-

१९ वेळा- वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा
१८ वेळा- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा*
१७ वेळा- ब्रेंडन मॅक्यूलम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---