इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये लॉर्डसच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यातील पहिला दिवस(१२ ऑगस्ट) भारतीय फलंदाजांचा बोलबाला होता, तर दुसऱ्या दिवशी(१३ ऑगस्ट) इंग्लिश गोलंदाजांनी हल्लाबोल केला. इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा संपूर्ण डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला.जेम्स अँडरसनने ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी (१२ ऑगस्ट) भारतीय फलंदाज जोरदार आक्रमण करत होते. परंतु, इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन जोरदार प्रत्युत्तर देत होता. जेम्स अँडरसनने पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना बाद करत माघारी धाडले होते. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना बाद करत,५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहला बाद करून जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३१ व्या वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यासह त्याने आर अश्विनला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ६ वे स्थान मिळवले आहे.
या यादीत अव्वल स्थानी दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६७ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर दुसऱ्या स्थानी माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न आहे. शेन वॉर्न यांनी ३७ वेळेस कसोटी क्रिकेटमध्ये ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.(Most five wickets haul in test cricket)
याबरोबरच सर्वाधिक वेळेस डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजामध्ये अँडरसन रिचर्ड्स हॅडली यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हॅडली यांनी ३६ वेळा असा कारनामा केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस एका डावात ५ गडी बाद करणारे गोलंदाज
१) मुथय्या मुरलीधरन : ६७
२) शेन वॉर्न : ३७
३) रिचर्ड्स हॅडली : ३६
४)अनिल कुंबळे : ३५
५) रंगांना हेरथ: ३४
६)जेम्स अँडरसन : ३१*
७)आर अश्विन :३०
महत्त्वाच्या बातम्या –
Video: पहिल्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या केएल राहुलचा ऑली रॉबिन्सनने असा काढला काटा
‘फुल टू फिल्मी’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला साखरपुडा, फोटो तुफान व्हायरल
‘तुझं टॅलेंट वाया घालवू नकोस, कोहलीकडून जरा शिक,’ पीटरसनने इंग्लंडच्या खेळाडूची घेतली शाळा