Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचा दबदबा! सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम कांगारुंच्या नावे, इतर संघ आसपासही नाहीत

November 15, 2021
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ चा अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाने आठ गडी राखून सामना जिंकला. मिशेल मार्शने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आपला दबदबा ठेवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत सहा वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत पाच एकदिवसीय विश्वचषक (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५) आणि एक टी२० विश्वचषक (२०२१) जिंकला आहे.

दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिज संघ आहे. त्यांनी चार वेळा आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट इंडिज संघाने आत्तापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक (१९७५, १९७९) आणि दोन वेळा टी२० विश्वचषक (२०१२, २०१६) जिंकला आहे. तिसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे. भारतीय संघाने तीन वेळा आयसीसी विश्वचषक जिंकला आहे. त्यात दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक (१९८३, २०११) आणि एक वेळा टी२० विश्वचषक (२००७) जिंकला आहे.

यासोबतच इंग्लड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी दोन वेळा आयसीसी विश्वचषक जिंकला आहे. त्यात एक एकदिवसीय विश्वचषक आणि एक टी२० विश्वचषक असे दोन चषक या संघांनी आपल्या नावे केले आहेत.

प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. केन विल्यमसनने ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले.

रविवारी (१४ नोव्हेंबर) अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऍरॉन फिंच अवघ्या ५ धावा करून माघारी परतला, त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. १५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर मिशेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मिशेल मार्शने ७७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय डेविड वॉर्नरनेही ५३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेलने २८ धावांची उपयुक्त खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिकवेळा उपविजेते होणाऱ्यांमध्ये न्यूझीलंड तिसरा, पहिल्या दोन क्रमांकावर ‘हे’ संघ

टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

केन विलियम्सनचा मोठा विक्रम! टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८५ धावा करत विश्वविक्रमाची केली बरोबरी


Next Post
Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स

तिसऱ्या एसएनबीपी महिला राज्य-स्तरीय हॉकी: महाराष्ट्र इलेव्हन, खेलो इंडिया सेंटर कोल्हापूर अंतिम लढत

पाचव्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी १६ वर्षांखालील स्पर्धा: हरअकॅडमी - सेल अकॅडमी संघात अंतिम झुंज रंगणार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143