टी२० क्रिकेटमध्ये एका एका चेंडूला महत्व असताना निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज सर्वोत्कृष्ट मानला जातो. वेस्टइंडीजच्या सुनील नरीन याच्या नावे चक्क सुपर ओवर निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. वनडेमध्ये सुरुवातीची षटके काहीवेळा निर्धाव गेलेली आपण पाहतो. परंतु खरे क्रिकेट जे मानले जाते त्या कसोटी क्रिकेटमध्ये निर्धाव षटकांची वारंवारिता जास्त असते.
इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्या दरम्यान ८ जूलैपासून सुरू झालेल्या प्रेक्षकविरहित कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आगेकूच केली आहे.
कसोटी सामन्यात सर्वाधिक निर्धाव षटकांचा जागतिक विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याच्या नावे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत तब्बल १७९४ निर्धाव शतके टाकली आहेत.
मुरलीधरन पाठोपाठ या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचा क्रमांक लागतो. वॉर्नने १४५ कसोटी सामने खेळताना १७६१ निर्धाव षटके गोलंदाजी केली आहे.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे हा देखील या यादीत समाविष्ट आहे. अनिल कुंबळेने १३२ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या निर्धाव षटकांची संख्या १५७६ इतकी नोंदवली आहे. तो कसोटीत सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा आहे. ऑस्ट्रेलियासाठी १२४ कसोटीमध्ये भाग घेत मॅकग्राने १४७० निर्धाव षटके टाकली आहेत.
आता मॅकग्राच्या पाठोपाठ अँडरसनचे नाव नोंदवले गेले आहे. त्याच्या नावे १५२ व्या कसोटीच्या दरम्यान आता १३९९ निर्धाव षटके जमा झाली आहेत. वेस्टइंडीजच्या लान्स गिब्स यांना मागे टाकत त्याने ही जागा आपल्या नावे केली.
ट्रेंडिंग घडामोडी –
गांगुलीचा केकेआरचा सहमालक शाहरुख खानवर गंभीर आरोप, शाहरुखने मला…
क्रिकेटर ते क्रीडामंत्री असा प्रवास केलेल्या माजी खेळाडूच्या पत्नीला कोरोनाची लागण
पोलिसांच्या कारवाईपासून जेव्हा स्वतःला वाचवत होता ‘हा’ क्रिकेटपटू, काही वेळातच झाला मृत्यू