---Advertisement---

व्वा रे पठ्ठ्या! पुनरागमन करताच ब्राव्होने केला ‘हा’ कारनामा; ठरला चौथा परदेशी खेळाडू

On: शुक्रवार, ऑक्टोबर 2, 2020 9:05 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील चौथा सामना होता. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने एक कारनामा केला आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएल २०२०मधील चेन्नई संघाच्या पहिल्या तीनही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु ब्राव्होने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले आहे. या सामन्यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा चौथा परदेशी खेळाडू ठरला आहे.

त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३५ सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. यामध्ये त्याने ब्रेंडन मॅक्यूलम (१०९), सुनील नरेन (११३), लसिथ मलिंगा (१२२), ख्रिस गेल (१२५) आणि डेविड वॉर्नर (१३०) या खेळाडूंना मागे टाकले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५७ सामने खेळले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू कायरन पोलार्ड आहे. त्याने १५२ सामने खेळले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू शेन वॉटसन असून त्याने १३८ सामने खेळले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे परदेशी खेळाडू-

१५७ सामने- एबी डिविलियर्स
१५२ सामने- कायरन पोलार्ड
१३८ सामने- शेन वॉटसन
१३५ सामने- ड्वेन ब्राव्हो
१३० सामने- डेविड वॉर्नर
१२५ सामने- ख्रिस गेल
१२२ सामने- लसिथ मलिंगा
११३ सामने- सुनील नरेन
१०९ सामने- ब्रेंडन मॅक्यूलम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---