---Advertisement---

सीएसकेकडून सर्वाधिक सामने खेळणारे ‘पाच पांडव’

On: गुरूवार, मे 19, 2022 10:00 AM
CSK
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स हा संघ आयपीएलमधील लोकप्रिय संघ म्हणून ओळखला जातो. या संघाचे भारभरात चाहते आहेत. तसेच अनेक दिग्गज खेळाडू या संघाचा भाग राहिले आहेत. चेन्नईची आयपीएलच्या १५ व्या हंगामात खास कामगिरी झालेली नसली, तरी त्यांना आयपीएलमधील एक यशस्वी संघ समजले जाते. तरी, या संघाकडून कोणत्या ५ खेळाडूंनी सर्वाधिक सामने खेळले आहेत, हे जाणून घेऊ.

क्रमांक १ : महेंद्रसिंग धोनी
एमएस धोनी सीएसकेकडून २२७ सामने खेळलाय. यात २२७ सामन्यांमध्ये त्याने एकूण ४८२७ धाव्या केल्यात. तसेच कर्णधार म्हणून धोनीने ४ वेळा संघाला चॅम्पियन देखील बनवलंय.

क्रमांक २ : सुरेश रैना
सुरेश रैना सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत नाहीये. मात्र, सीएसकेकडून त्याने २०० सामने खेळलेत. यात १९५ इनिंगमध्ये ५,५२९ धावा केल्या असून ३६ विकेट्सही घेतल्या आहेत.

क्रमांक ३ : रविंद्र जडेजा
पंधराव्या हंगामात सीएसकेचा कर्णधार बनलेल्या रविंद्र जडेजाने नंतर हे कर्णधारपद सोडले. पण तो सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. सीएसकेकडून १५६ सामने खेळलाय. ज्यात त्याने १,५९६ धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजीत ११४ बळी घेतलेत.

क्रमांक ४ : ड्वेन ब्राव्हो
चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू असलेल्या ड्वेन ब्राव्होने सीएसकेकडून १३० सामने खेळलेत. ज्यात त्याने १,२८० धावा केल्या असून १५४ बळी घेतले आहेत.

क्रमांक ५ : रविचंद्रन आश्विन
सीएसकेचा माजी खेळाडू असलेल्या आर आश्विनने चेन्नई सुपर किंग्जकडून १२१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२० बळी घेतले आहेत. तर ४० इनिंगमध्ये २८८ धावाही केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नईने संघातून काढले पण रेकॉर्ड बूकमधून कुणीच यांना काढू शकणार नाही | CSK | TOP PLAYERS

वाचा – 

‘कॅरेबियन फ्लेवर’शिवाय आयपीएलला मजा नाय

मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---