भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर तिसऱ्या वनडेत खास विक्रमाची नोंद झाली आहे. विराट आणि रोहित यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन तसेच सौरव गांगुली यांना या विक्रमात पछाडले आहे. चला तर जाणून घेऊया या दोघांनी नेमका काय विक्रम केला आहे.
विराट- रोहितचा विक्रम
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मैदानावर पाऊल ठेवताच खास कारनामा केला. विराट आणि रोहित हे भारतीय संघाकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाले आहेत. विराटने भारतासाठी 490वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे, तर रोहित भारतासाठी त्याचा 434वा सामना खेळत आहे. अशाप्रकारे विराटने चौथे, तर रोहितने पाचवे स्थान पटकावले आहे.
याबाबतीत त्यांनी मोहम्मद अझरुद्दीन (433) आणि सौरव गांगुली (421) या दिग्गजांचा विक्रम मोडला आहे. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सचिनने भारतासाठी सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी भारताचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आहे. त्याने भारताकडून 535 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानी माजी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याने भारतीय संघाकडून 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारतीय संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
664 सामने- सचिन तेंडुलकर
535 सामने- एमएस धोनी
504 सामने- राहुल द्रविड
490 सामने- विराट कोहली*
434 सामने- रोहित शर्मा*
433 सामने- मोहम्मद अझरुद्दीन
421 सामने- सौरव गांगुली
भारताकडे क्लीन स्वीपची संधी
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसरा वनडे सामना खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने आपल्या नावावर केले आहेत. अशात तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. (Most matches played for India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल
द्रविडकडून रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव, वनडेमध्ये सलामीवीराच्या रूपात गाठला यशाचा मोठा टप्पा