---Advertisement---

टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार, धोनी-रोहितच्या लिस्टमध्ये शनाका-मार्करमची एंट्री!

On: गुरूवार, फेब्रुवारी 12, 2026 5:38 PM
MS-Dhoni-And-Rohit-Sharma
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषकाची दहावी आवृत्ती भारत-श्रीलंकेत खेळली जात आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एका विक्रमामध्ये भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी याचेच राज्य आहे. या विक्रमाच्या यादीत रोहित शर्माचाही समावेश आहे, मात्र विराट कोहली नाही. आता या यादीत श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ऍडन मार्करम यांचा समावेश झाला आहे.

टी२० विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून धोनीचाच बोलबाला आहे. त्याने या स्पर्धेत ३३ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक असे २० सामने जिंकले आहेत. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियमसनचा क्रमांक लागतो. त्याने कर्णधारपद सांभाळताना २१ पैकी १४ सामने जिंकले आहेत. भारताचा रोहितही काही मागे नाही. त्याने १४ पैकी १२ सामने जिंकले आहे. यावरून त्याचे नेतृत्व उत्तमच होते, याचा अंदाज येतो.

श्रीलंकेने आज (११ फेब्रुवारी) ओमानला पराभूत केले आणि शनाकाच्या नावावर ११वा विजय नोंदवला गेला.त्याने १८ टी२० विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व केले. मार्करमने ११ पैकी १० सामने जिंकले आहेत. त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये हा मोठा पराक्रम केला आहे. या यादीत आणखी काही कर्णधार सामील असून ते खालीलप्रमाणे,

टी२० विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार
एमएस धोनी (भारत) – २० विजय (३३ सामने)
केन विलियमसन (न्यूझीलंड) – १४ विजय (२१ सामने)
रोहित शर्मा (भारत) – १२ विजय (१४ सामने)
बाबर आझम (पाकिस्तान) – ११ विजय (१७ सामने)
डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज) – ११ विजय (१८ सामने)
ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) ११ विजय (१६ सामने)
दसुन शनाका (श्रीलंका) -११ विजय (१४ सामने)
कुमार संगकारा (श्रीलंका) – १० विजय (१४ सामने)
ऍडम मार्करम (दक्षिण आफ्रिका ) – १० विजय (११ सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---