जेव्हाही जगातील दिग्गज खेळाडूंच्या विक्रमांची चर्चा होते, त्यामध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर ही दोन भारतीय नावे आवर्जुन घेतली जातात. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक शतके करणाऱ्या अव्वल दोन स्थानी अनुक्रमे सचिन (100) आणि विराट (74) ही दोन नावे आहेत. विराट ज्या वेगाने शतकांचा पाऊस पाडत आहे, ते पाहून तो लवकरच सचिनच्या शतकांच्या शतकाचा विक्रम लवकरच मोडेल, असा सूर चाहत्यांमध्ये आहे. अशात आता विराटने आणखी एक शतक झळकावल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. विराटने शतक ठोकत सचिनचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दीडशतक ठोकले. विराटने यादरम्यान 110 चेंडूत 8 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 166 धावांचा पाऊस पाडला. विराटने यावेळी शतक झळकावण्यासाठी 85 चेंडूचा सामना केला होता. विशेष म्हणजे, विराटच्या या खेळीमुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावांचा डोंगर उभा केला.
विराटने साकारलेल्या शतकामुळे त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. वनडे क्रिकेटमध्ये विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराटने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 10 शतके झळकावली आहेत. या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर विराट आणि सचिन तेंडुलकर आहेत. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध 9 वनडे शतके झळकावली होती, तर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक 9 शतके झळकावली होती.
विरोधी संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणारे भारतीय
10 शतके- विराट कोहली, विरुद्ध- श्रीलंका*
9 शतके- विराट कोहली, विरुद्ध- वेस्ट इंडिज
9 शतके- सचिन तेंडुलकर, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया
3RD ODI. India Won by 317 Run(s) https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 15, 2023
भारताने मालिका केली नावावर
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 391 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 22 षटकात 73 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना तब्बल 317 धावांनी जिंकला. यासह भारताने मालिकाही नावावर करत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. (Most ODI 100s vs Opponent by indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे पर्व सचिनचे नाही, तर विराटचे! वनडेत 46वे शतक ठोकण्यासाठी दोघांनी खेळले ‘एवढे’ डाव
विराटची वादळी खेळी माहेला जयवर्धनेला पडली महागात, महान फलंदाजांच्या यादीतून झाला पत्ता कट