Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

INDvSL: शेवटच्या वनडेत भारताची ‘या’ वर्ल्डरेकॉर्डवर नजर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी

INDvSL: शेवटच्या वनडेत भारताची 'या' वर्ल्डरेकॉर्डवर नजर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी

January 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
KL Rahul, Rohit Sharma & Umran Malik

Photo Courtesy: Twitter/ BCCI


भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) रविवारी (15 जानेवारी) यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार असून सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. हा सामना जिंकत भारताला मालिकेत 3-0 असा विजय आणि मोठा विश्वविक्रम नावावर नोंदवण्याची संधी आहे.

तिसरा सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताची दृष्टी इतिहास रचण्यावर असणार आहे. भारताने कोलकातामध्ये झालेला दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. तो भारताचा श्रीलंकेविरुद्धचा एकूण 95वा विजय होता आणि त्यानंतर भारताने एका संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. आता रविवारचा सामना जिंकत भारताला ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी आहे. हा सामना भारताने जिंकला तर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा संघ भारत बनेल.

तिसऱ्या वनडेसाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यजमानांनी पहिला सामना जो गुवाहाटीमध्ये झाला तो 67 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. यामध्ये ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ही नावे चर्चेत आहेत.

सूर्यकुमारने वनडे मालिकेआधी झालेल्या टी20 मालिकेत नाबाद शतक केले होते. तसेच ईशाननेही त्याच्या शेवटच्या वनडेत जलद द्विशतकी खेळी केली होती. तो एक विक्रमच ठरला होता. त्याने बांगलादेशविरुद्ध 131 चेंडूत 210 धावा केल्या होत्या. (Teams with the most ODI wins against a single team INDvSL 3rd ODI)

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने जिंकणारे संघ-
भारत विरुद्ध श्रीलंका – 95*
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – 95
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – 92
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – 87
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – 80

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात! पाकिस्तानने आणखी एक मालिका गमावली, न्यूझीलंडसाठी मोठा विजय
आणखी एक क्रिकेटपटू बीसीसीआयची वाट पाहून कंटाळला! म्हणाला, ‘विदेशात खेळण्याची….’


Next Post

चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास

Photo Courtesy: Twitter/ICC

त्रिशतक आले कामी! टीम इंडियात निवड होताच पृथ्वी शॉने शेअर केली इंस्टाग्राम स्टोरी

Ind-vs-Aus

भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडकर्त्यांनी मोठ्या खेळाडूला दिला डच्चू, पठ्ठ्या चांगलाच भडकला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143