क्रिकेटजगतात आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत घडलेल्या काही दिग्गज खेलाडूंच्या नावावर काही मोठ्या इनिंग्जची नोंद देखील आहे. मात्र, फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच खेळाडू अशाप्रकारे मोठी खेळू करू शकतात असे नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनेकदा खेळाडूंनी द्विशतके आणि त्रिशतके केल्याचे आपण पाहिले आहे. पण महाराष्ट्राच्या एका युवा फलंदाजाने हे सर्व क्रमक मोडत 500 धावा झोडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
क्रिकेटजगतात ही अविश्वसनीय खेळी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा अशा दिग्गज खेळाडूंपैकी एखाद्या खेळाडूने ही खेळी नसून अवघ्या 13 वर्षीय फलंदाजाने ही खेळी केली आहे. महाराष्ट्राच्या या फलंदाजाचे नाव यश चावडे आहे. यशने 40-40 षटकांच्या या सामन्यात 508 धावांची वादळी खेळी करत सर्वांना आश्चर्यचकीत केले. या युवा फलंदाजाने मुंबई इंडियन्स जूनियर स्कूल टूर्नामेंटमध्ये ही धडाकेबाज खेळी केली. त्याची आकडेवारी पाहून अनेकांना विश्वास बसत नाहीये.
सरस्वती स्कूलकडून खेळताना यश चावडेने या 508 धावा कुटल्या. या धावा करण्यासाठी त्याने अवघ्या 178 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 18 षटकार आणि 81 चौकार निघाले. यशच्या या वादळी खेळीच्या जोरावर सरस्वती स्कूल संघाने या सामन्यात 714 धावांची विशाल दावसंख्या उभी केली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला विरोधी संघ्या अवख्या 5 षटकांमध्ये सर्वबाद झाला. इंटर स्कूल लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये यश 500 धावांपेक्षा मोठी धावसंख्या करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. 15 वर्षांखालील क्रिकेटमध्ये अशी खेळी करणाऱ्यांमध्ये श्रीलंकेचा चरिथ पहिल्या क्रमांकावर आहे. चरिथने त्याच्या संघासाठी 553 धावांची खेळी केली होती. (The 13-year-old made history by scoring 500 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूची टीम इंडियात एंट्री एवढी पण सोपी नाही! ऑस्ट्रेलियाला भिडण्याआधी करावे लागेल ‘हे’ एक काम
‘… हा तर रणजी ट्रॉफीचा अपमान’, सरफराजला वगळून सूर्याला घेतल्याने भडकले चाहते