शुक्रवारी (13 जानेवारी) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना निवडले. त्याचबरोबर या संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचेही पुनरागमन झाले, मात्र बीसीसीआयने त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023चा पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूर आणि दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यांसाठी जडेजाची निवड तर झाली मात्र त्याला संघात येण्याआधी एकतरी स्थानिक क्रिकेटचा सामना खेळावा लागेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
भारताने 2022चा शेवट चांगला केला. त्यांनी बांगलादेश दौऱ्यात कसोटी मालिका जिंकत आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा मजबूत केल्या. जडेजाने भारताकडून शेवटचा कसोटी आणि वनडे सामना जुलै 2022मध्ये इंग्लंड दौऱ्यात खेळला होता. त्यानंतर त्याने शेवटचा टी20 सामना आशिया चषकात खेळला. या स्पर्धेनंतर तो दुखापतग्रस्त झाला आणि टी20 विश्वचषकासही मुकला.
जडेजाला बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी निवडले होते, मात्र तो संपूर्णपणे फिट नसल्याने तो त्या मालिकेसही मुकला. त्याचबरोबर तो घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धही खेळला नाही. आता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडले आहे. पण त्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी त्याने पूर्णपणे फिट असणे आवश्यक आहे.
जडेजाने किमान एकतरी स्थानिक सामना खेळावा. तो फिट असला तर संघाच्याही अडचणी दूर होती. संघाला एक डावखुरा फलंदाज आणि गोलंदाजीत एक अतिरिक्त खेळाडू मिळेल, असे वृत्त समोर येत आहे. तो एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये त्याने उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे.
जडेजाला 60 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने 3 शतकांसह 242 विकेट्सही घेतल्या आहेत. यातील 2 शतकी खेळी तर त्याने 2022मध्येच केल्या होत्या. (Ravindra Jadeja asked to play at least 1 domestic game before the INDvAUS Test series)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने गायले सूर्याचे गोडवे! म्हणाले, ‘तो ज्याप्रकारे खेळतो ते पाहून विव रिचर्ड्सची आठवण..’
‘… हा तर रणजी ट्रॉफीचा अपमान’, सरफराजला वगळून सूर्याला घेतल्याने भडकले चाहते