क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत असलेल्या विश्वचषकाची स्पर्धा पुढील वर्षी म्हणजेच 2019मध्ये 30 मे ते 14 जुलै या काळात रंगणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन-डे विश्वचषकामधील भारताच्या सामन्यांची सगळी तिकिटे विकली गेली आहेत.
या स्पर्धेतील केवळ 3500 तिकीटे बाकी आहेत. तर 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्डवर होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची सर्व तिकीटे विकली गेली आहे, असे आयसीसीचे अधिकारी कॅम्पबेल जॅमिसन यांनी सांगितले.
एकूण 48 सामने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने भारतीय बियर ब्रॅंड बीरा 91 बरोबर करार केला आहे.
या स्पर्धेचा पहिला सामना 30 मेला यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. तर अंतिम सामना 14 जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–४०८ दिवसानंतर युवराजने काढली क्रिकेटमधील पहिली धाव
–हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर
–१०२ भारतीय फलंदाजांचा विक्रम मोडण्याची विराटला संधी