भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने भारतीय क्रिकेटपटूंच्या वागण्यावर टीका केली आहे. आपल्या कठीण काळात भारतीय क्रिकेटपटू आपल्याकडे पाहत देखील नव्हते, असा आरोप त्याने केला आहे.
श्रीशांतला पाहिल्यावर काही खेळाडू हे दुर राहण्याचा प्रयत्न करतात. केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मणसह एक- दोन खेळाडू असे आहेत जे श्रीशांतबरोबर संपर्कात होते.
३७ वर्षीय श्रीशांतवर २०१३मध्ये स्पाॅट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने अजिवन बंदी घातली होती. परंतु गेल्याच वर्षी ही बंदी उठविण्यात आली.
कठीण काळात अनेक खेळाडू आपल्या पाहिले तरी रस्ता बदलत असे, केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोन खेळाडू संपर्कात होते, असे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीशांत म्हणाला.
परंतु गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली असून सचिनबरोबर ट्विटरवर बोलणं झालं होतं. तसेच गंभीर, भज्जी यांना भेटणंही झालं होतं, असे श्रीशांत पुढे म्हणाला.
हरभजन सिंग व एस श्रीशांत हे दोनच असे भारतीय पुर्णवेळ गोलंदाज आहेत जे २००७ टी२० विश्वचषक व २०११ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाचे अंतिम सामन्यात सदस्य होते.