---Advertisement---

गिल भाऊंची गाडी थांबेच ना! सर विवियन रिचर्ड्स यांनाही पछाडत करून दाखवला वनडेतील ‘हा’ जबरा विक्रम

On: मंगळवार, जानेवारी 24, 2023 7:44 PM
Shubman-Gill-Record
---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिल याच्या रूपात भारतीय संघाला विस्फोटक युवा फलंदाज मिळाला आहे. गिलने जबरदस्त फलंदाजीने कमी काळात स्वत:ला सिद्ध केले आहे. तो एकापाठोपाठ एक शतके ठोकत विक्रमांचा रतीब घालत आहे. आता त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत पुन्हा एकदा शतक ठोकत जबरदस्त विक्रम केला. या विक्रमात त्याने जगातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे. चला तर पाहूयात गिलने काय विक्रम रचलाय…

न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आह. या दौऱ्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. त्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तिसरा वनडे सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने 78 चेंडूत 112 धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये 5 षटकार आणि 13 चौकारांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, गिल त्याचा 21व्या वनडे सामन्यातील 21वा डाव खेळत होता. या डावात शतक मारताच त्याने खास विक्रम नोंदवला.

https://twitter.com/BCCI/status/1617822841361293312

वनडे क्रिकेटमध्ये 21 डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 23 वर्षीय शुबमन गिल अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याने 21 डावात 73.76च्या सरासरीने 1254 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकांचाही समावेश आहे. गिलनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानी खेळाडू इमाम-उल-हक आहे. त्याने 1090 धावा केल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचाच फलंदाज फखर जमान असून त्याने 21 वनडे डावांनंतर 1089 धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या स्थानी वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड्स आहेत. त्यांनी 21 वनडे डावांनंतर 1059 धावा चोपल्या होत्या. या यादीत पाचव्या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. त्याने 21 डावांनंतर 1037 धावा केल्या होत्या. (Most runs after 21 ODI inns shubman gill at the top)

वनडे क्रिकेटमध्ये 21 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1254 धावा- शुबमन गिल*

1090 धावा- इमाम-उल-हक
1089 धावा- फखर जमान
1059 धावा- सर विवियन रिचर्ड्स
1037 धावा- बाबर आझम

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल
टीम इंडिया फोडणारच! नव्या वर्षातील ही तुफानी आकडेवारी समोर, तीन प्रतिस्पर्धी नामोहरम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---