इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २४वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. गुरुवारी (दि. १४ एप्रिल) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने खास विक्रम केला. त्याने या सामन्यात राजस्थानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले. यासह तो एका यादीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान (Rajasthan Royals) संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरात (Gujarat Titans) संघाकडून मॅथ्यू वेड (Mattew Wade) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी सलामी दिली. मात्र, यावेळी वेड १२ धावांवरच धावबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला स्वत: कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आला. पंड्याने शेवटच्या चेंडूपर्यंत टिकत संघाला समाधानकारक १९२ अशी धावसंख्या उभारून दिली. यावेळी त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ८ चौकारांचा पाऊस पाडत नाबाद ८७ धावा केल्या. यासह त्याने या हंगामात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या.
FIFTY for the @gujarat_titans Skipper 💪💪
His 6th in #TATAIPL
Live – https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/LE1qyiKIWg
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
पंड्याने कर्णधार म्हणून या हंगामात खेळलेल्या ५ सामन्यात ७६च्या सरासरीने २२८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या धावा त्याने १३६.५३च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पंड्यापाठोपाठ आयपीएल २०२२मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फाफ डू प्लेसिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४६ धावा केल्या आहेत. तसेच, केएल राहुल तिसऱ्या स्थानी असून त्याने १३२, चौथ्या स्थानी असणाऱ्या श्रेयस अय्यरने १२३, पाचव्या स्थानी असणाऱ्या संजू सॅमसनने ११७ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त सहाव्या स्थानी असलेल्या रिषभ पंतने ११०, रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर असून त्याने १०८, आठव्या क्रमांकावरील केन विलियम्सनने १०७, नवव्या क्रमांकावरील मयंक अगरवालने ९४ आणि दहाव्या क्रमांकावरील रवींद्र जडेजाने ६६ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२२मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२२८ धावा- हार्दिक पंड्या*
१४६ धावा- फाफ डू प्लेसिस
१३२ धावा- केएल राहुल
१२३ धावा- श्रेयस अय्यर
११७ धावा- संजू सॅमसन
११० धावा- रिषभ पंत
१०८ धावा- रोहित शर्मा
१०७ धावा- केन विलियम्सन
९४ धावा- मयंक अगरवालघ
६६ धावा- रवींद्र जडेजा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल