क्रिकेटमध्ये वयानुसार वेगवेगळ्या स्तरावर क्रिकेट खेळले जाते. अगदी ८व्या वयापासून हे स्तर सुरु होतात. अनेक खेळाडू अंडर १९ अर्थातच १९ वर्षाखालील संघाचे सदस्य होऊन म्हणून मग क्रिकेटमध्ये येतात.
परंतु काही क्रिकेटपटू हे यापुर्वीच कसोटीतून किंवा वनडेतून आंतराष्ट्रीय पदार्पण करतात. तसेच त्यांनी यापुर्वीच प्रथम श्रेणी सामनेही खेळलेले असतात व त्यात चमकदार कामगिरी केलेली असते.
१९ वर्ष वयापुर्वी १० कसोटी सामने खेळणे ही नक्कीच सोप्पी गोष्ट नाही. अनेक महान खेळाडूंना १००-२०० वनडे खेळल्यावरही १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.
जगात २१७ खेळाडूंनी वयाच्या १९ वर्षांपुर्वीच कसोटीत पदार्पण केले होते. यातील २० खेळाडूंनी १९ वर्ष वयापुर्वीच १० किंवा अधिक कसोटी सामने खेळले आहे.
भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या १९ वर्षांपुर्वीच २५ कसोटी सामने खेळण्याचा कारनामा केला होता. आजपर्यंत सचिन सोडून कोणत्याही खेळाडूला या वयात १९पेक्षा जास्त कसोटी सामने खेळता आलेले नाही.
१९ वर्ष वयापुर्वी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू
२५ सामने- सचिन तेंडूलकर
१९- मोहम्मद अश्रफउल, पार्थिव पटेल
१६- डेनियल विटोरी
१४- अलोक कपाली, मोहम्मद आमीर, मुश्ताक मोहम्मद, नसीम उल घनी
१९ वर्ष वयापुर्वी सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू
१५२२ धावा- सचिन तेंडूलकर
८६८ धावा- मुश्ताक मोहम्मद
७९८ धावा- मोहम्मद अश्रफउल
६६९ धावा- पार्थिव पटेल
६६५ धावा- जावेद मियाॅंदाद
१९ वर्ष वयापुर्वी सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे खेळाडू
५५ विकेट्स- वकार युनुस
५४ विकेट्स- डेनियल विटोरी
५१ विकेट्स- मोहम्मद आमीर
४३ विकेट्स- मेहडी हसन मिराज
३७ विकेट्स- नसीम उल घनी
ट्रेंडिंग घडामोडी –
१७ वर्षांपुर्वी इरफानला पाकिस्तानचा तो खेळाडू असं काही वाईट बोलला होता की आजही…
आपण ज्या वयात बारावीत शिकतं होतो त्या वयात ते खेळले होते ५० वनडे
…म्हणून धोनी आहे विराट-सचिनला सरस, कारकिर्दीच्या सुरुवातीला या कारणाने ठरला हिरो






