रत्नागिरी जेट्स संघ महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. शुक्रवारी (दि. 30 जून) कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघ अंतिम सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोल्हापूर संघाला पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण 20 षटकांचा खेळ खेळता आला नाही. तसेच, रत्नागिरी संघाने एक षटकही फलंदाजी केली नाही. त्यामुळे झाले असे की, गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या रत्नागिरी संघाला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. असे असले, तरीही क्वालिफायर 2 सामन्यातून बाहेर पडलेल्या पुणेरी बाप्पा संघाने या सामन्यात जबरदस्त विक्रम नावावर केला आहे.
एमपीएल 2023 (MPL 2023) स्पर्धेत सांघिक कामगिरीच्या बाबतीत पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघाने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. पुणे या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला. विशेष म्हणजे, या विक्रमाच्या बाबतीत एकूण 6 संघांमध्ये पुणे सोडून इतर 5 संघांना ही कामगिरी करता आली नाहीये. चला तर पुण्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
पुण्याच्या सर्वाधिक धावा
पुणेरी बाप्पाने संघाच्या रूपात ही स्पर्धा गाजवली. एमपीएल स्पर्धेत पुण्याने 1000 धावांचा टप्पा पार केला. स्पर्धेत पुणेरी बाप्पा 1028 धावा (Puneri Bappa 1028 Runs) करून विक्रमवीर बनला. विशेष म्हणजे, पुण्याकडून एकाही फलंदाजाने शतक न लगावता हा विक्रम रचला गेला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी स्पर्धेचा उपविजेता कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघ आहे. कोल्हापूरने या स्पर्धेत 969 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
हेही वाचा- MPL 2023 स्पर्धेत ‘या’ 5 फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, पुणेरी बाप्पाचा ऋतुराज ‘या’ स्थानी विराजमान
याव्यतिरिक्त स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा संघ ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) आहे. नाशिकने स्पर्धेत 1 शतकाच्या मदतीने 966 धावांचा डोंगर उभारला. यादीत चौथ्या स्थानी चॅम्पियन रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) संघ असून त्यांनी स्पर्धेत 902 धावा केल्या. तसेच, पाचव्या स्थानी असलेल्या छत्रपती संभाजी किंग्स संघाला एकूण स्पर्धेत 696 धावा, तर सहाव्या स्थानी असलेल्या सोलापूर रॉयल्स संघाला 665 धावांवर समाधान मानावे लागले. (Most Runs by teams in MPL 2023 Puneri Bappa ross 1000 runs)
एमपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
1028- पुणेरी बाप्पा
969- कोल्हापूर टस्कर्स
966- ईगल नाशिक टायटन्स
902- रत्नागिरी जेट्स
696- छत्रपती संभाजी किंग्स
665- सोलापूर रॉयल्स
महत्वाच्या बातम्या-
पुण्याने गमावली एमपीएल ट्रॉफी, पण सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पुणेकरांचीच आघाडी
BREAKING: रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL 2023 ची ट्रॉफी! कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा