---Advertisement---

WTC Finalsमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, 18 महिन्यांनी कमबॅक करणारा रहाणे दिग्गजांवर भारी

On: रविवार, जून 11, 2023 9:24 PM
Ajinkya-Rahane-And-Rohit-Sharma-And-Virat-Kohli
---Advertisement---

रविवारी (दि. 11 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने तब्बल 209 धावांनी जिंकत भारतीय संघाचे 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला, तरीही 18 महिन्यांना भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे तो  2021 आणि 2023च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनाही पछाडले.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 129 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 11 चौकार मारले. तसेच, दुसऱ्या डावात त्याने 108 चेंडूत 7 चौकारांसह 46 धावा केल्या. यामुळे त्याच्या 135 धावा झाल्या. तसेच 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 49 आणि 15 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या एकूण 64 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्याने दोन्ही अंतिम सामन्यात एकूण 199 धावा केल्या. तो भारतासाठी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा अव्वल फलंदाज ठरला. तसेच, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय बनण्याचा मानही रहाणेला मिळाला.

रहाणेव्यतिरिक्त डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 2021मध्ये 34 आणि 30 अशा एकूण 64 धावा केल्या होत्या. तसेच, 2023मध्ये 15 आणि 43 अशा एकूण 58 धावा केल्या. अशाप्रकारे त्याने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एकूण 122 धावा झाल्या. रोहितनंतर तिसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने 2021मध्ये डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 13 अशा 57 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता 2023च्या अंतिम सामन्यात त्याने 14 आणि 49 अशा एकूण 63 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या दोन्ही डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात मिळून 120 धावा झाल्या.

या यादीत चौथ्या स्थानी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आहे. त्याने 2021च्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात 16 अशा 31 धावा केल्या होत्या. आता 2023च्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 0 धाव केली. अशाप्रकारे त्याच्या एकूण 79 धावा झाल्या. याव्यतिरिक्त शेवटच्या म्हणजेच पाचव्या स्थानी सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आहे. त्याने 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील पहिल्या डावात 28 आणि दुसऱ्या डावात 8 अशा एकूण 36 धावा केल्या होत्या. तसेच, 2023च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील पहिल्या डावात 13 आणि दुसऱ्या डावात 18 अशा एकूण 31 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या नावावर दोन्ही डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एकूण 67 धावा झाल्या. (Most runs for India in WTC Finals)

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय
199 – अजिंक्य रहाणे
122 – रोहित शर्मा
120 – विराट कोहली
79 – रवींद्र जडेजा
67 – शुबमन गिल

महत्वाच्या बातम्या-
शुमबन गिलच्या वादामुळे रोहितकडून डब्ल्यूटीसीची आयपीएलसोबत तुलना! म्हणाला, ‘आमच्या इथे…’
‘जरा तरी लाज असेल, तर कर्णधारपद सोड…’, WTC Finalमध्ये पराभूत होताच रोहितवर भडकले चाहते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---