मुंबई इंडियन्सने बुधवारी (दि. १३ एप्रिल) आयपीएल २०२२मधील आपला पाचवा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेला हा आयपीएलच्या १५व्या हंगामातील २३वा सामना होता. हा सामना मुंबईसाठी खूपच महत्त्वाचा होता. कारण, मुंबईने या हंगामात खेळलेल्या पहिल्या ४ सामन्यात पराभवाचा सामना केला होता. दरम्यान, या सामन्यात पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डेवाल्ड ब्रेविसने आतिषी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. यासह त्याने कायरन पोलार्ड, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत खास यादीत स्थान मिळवले आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला येत पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९८ धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबई संघाकडून उतरलेला डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Bravis) खूपच आक्रमक खेळ दाखवला. त्याने या सामन्यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या २५ चेंडूत ४९ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. विशेष म्हणजे, या ५ षटकारांपैकी ४ षटकार त्याने सलग मारले होते. यादरम्यान १ चौकार आणि ४ षटकार मारत त्याने आपल्या नावावर खास विक्रमाची नोंद केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
झाले असे की, पंजाबकडून ९वे षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल चाहर आला होता. यावेळी चाहरने पहिला चेंडू तिलक वर्माला फेकला. यावर वर्माने १ धाव घेत ब्रेविसला स्ट्राईक दिली. यावेळी ब्रेविसने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर त्याने पुढील चारही चेंडूंवर खणखणीत षटकार मारले. चाहरच्या या षटकात त्याच्या बॅटमधून २८ धावा निघाल्या. यासह तो मुंबई इंडियन्सकडून एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हार्दिक पंड्यासह संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 𝐇𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠. 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvPBKS pic.twitter.com/annSXtG5Xb
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2022
यापूर्वी हार्दिक पंड्याने अशोक डिंडाच्या गोलंदाजीवर एका षटकादरम्यान २८ धावा चोपल्या होत्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने ऍडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर आतिषी खेळी करत २७ धावांचा पाऊस पाडला होता. तसेच, हार्दिक पंड्याने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर २६ धावा, रोहित शर्माने डेविड हसीच्या गोलंदाजीवर २६ आणि पुन्हा एकदा पोलार्डने अमित मिश्राच्या गोलंदाजीवर २६ धावा चोपल्या होत्या.
मुंबई इंडियन्सकडून एका षटकात सर्वाधिक धावा चोपणारे फलंदाज
२८ धावा- डेवाल्ड ब्रेविस (विरुद्ध राहुल चाहर)*
२८ धावा- हार्दिक पंड्या (विरुद्ध अशोक डिंडा)
२७ धावा- कायरन पोलार्ड (विरुद्ध ऍडम झॅम्पा)
२६ धावा- हार्दिक पंड्या (विरुद्ध कार्तिक त्यागी)
२६ धावा- रोहित शर्मा (विरुद्ध डेविड हसी)
२६ धावा- कायरन पोलार्ड (विरुद्ध अमित मिश्रा)
याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये एका षटकात फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक धावा चोपणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. गेलने २०१२ साली राहुल शर्माच्या षटकात ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीनेही २०१६ साली शिविल कौशिकच्या गोलंदाजीवर ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गेलने २०१३ साली ऍरॉन फिंचविरुद्ध २८ धावा, निकोलस पूरनने २०२० साली अब्दुल सामदविरुद्ध २८ धावा, आणि आता ब्रेविसने राहुल चाहरविरुद्ध डेवाल्ड ब्रेविसने २८ धावा केल्या.
आयपीएलमध्ये फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
३० धावा- ख्रिस गेल (विरुद्ध राहुल शर्मा, २०१२)
३० धावा- विराट कोहली (विरुद्ध शिविल कौशिक, २०१६)
२८ धावा- ख्रिस गेल (विरुद्ध ऍरॉन फिंच, २०१३)
२८ धावा- निकोलस पूरन (विरुद्ध अब्दूल सामद, २०२०)
२८ धावा- डेवाल्ड ब्रेविस (विरुद्ध, राहुल चाहर, २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभराव्या आयपीएल डावात मयंकची शानदार फिफ्टी; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच केला खास कारनामा
हे नाही पाहिलं, तर काय पाहिलं? टी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात घेतल्या गेल्या ६ विकेट्स, VIDEO VIRAL