हे नाही पाहिलं, तर काय पाहिलं? टी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात घेतल्या गेल्या ६ विकेट्स, VIDEO VIRAL

हे नाही पाहिलं, तर काय पाहिलं? टी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात घेतल्या गेल्या ६ विकेट्स, VIDEO VIRAL

क्रिकेटमधील सर्वात छोटा प्रकार म्हणजे टी२० होय. या टी२० क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज नेहमीच आपला जलवा दाखवताना दिसतात. कधी फलंदाज चौकार- षटकार ठोकत धावांचा पाऊस पडतात, तर कधी गोलंदाज एकाच षटकात अशी काही गोलंदाजी करतात, ज्यामुळे पाहणाऱ्यासाठीही ते जणू पर्वणीच ठरते. आता याच टी२० क्रिकेटमध्ये असे काहीसे घडले आहे, जे कदाचित इतिहासात कधीही घडले नसेल.

नेपाळमध्ये सध्या प्रो क्लब चॅम्पियनशिप खेळली जातेय. यामध्ये खेळलेल्या एका सामन्यादरम्यान पहिल्यांदाच चकित करणारी घटना पाहायला मिळाली. या स्पर्धेतील एका सामन्यात पुश स्पोर्ट्स दिल्ली आणि मलेशिया इलेव्हन संघ आमने-सामने होते. यावेळी पुश स्पोर्ट्स दिल्लीच्या संघ आपल्या डावाच्या शेवटच्या षटकात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. संघाने ६ चेंडूत ६ विकेट्स गमावले. असे पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

पुश स्पोर्ट्स संघाने १९व्या षटकात ३ विकेट्स गमावत १३१ धावा कुटल्या होत्या. डावाच्या शेवटचे षटक मलेशिया इलेव्हनचा गोलंदाज विरनदीप सिंग (Virandeep Singh) टाकण्यासाठी आला होता. यावेळी पुश स्पोर्ट्सचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार मारत धावसंख्येचा आकडा वाढवतील अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी भलतेच काहीसे पाहायला मिळाले. मलेशियाच्या १९ वर्षांखालील खेळाडू विरनदीप सिंगने या षटकात आपली हॅट्रिक पूर्ण केली. या षटकातील प्रत्येक नवीन चेंडूवर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मृगंक पाठक ३९ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ईशान पांडे धावबाद झाला. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनिंदो नाहारे, विशेष सरोहा, जतिन सिंघल हे खेळाडू ‘गोल्डन डक’ म्हणजेच आपल्या पहिल्या चेंडूवर शून्य धावेवर बाद झाले. तसेच, विरनदीपच्या हॅट्रिकचे शिकारही झाले. यानंतर डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्पर्शदेखील ‘गोल्डन डक’ होत बाद झाला आणि पुश स्पोर्ट्स संघ ९ विकेट्स गमावत १३२ धावाच करू शकला.

https://www.youtube.com/watch?v=AOQSsUlSBEs

या सामन्यात फक्त २ षटके टाकणाऱ्या विरनदीप सिंगने फक्त ९ धावा खर्च करत हॅट्रिकसह आपला ५ विकेट्स हॉलही पूर्ण केला. या शानदार कामगिरीसाठी विरनदीपला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यापूर्वी एकाच षटकात ६ विकेट्स घेण्याचा कारनामा १९५१ साली घडला होता. त्यावेळी थॉमस हंटर कपमध्ये एका गोलंदाजाने ६ चेंडूंवर ६ विकेट्स घेतल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित

IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.