नेपीयर | दुखापतीमधून सावरलेल्या मार्टीन गप्टीलने आज जोरदार पुनरागमन बांगलादेश विरुद्ध जबरदस्त शतकी खेळी केली.
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेला आज सुरुवात झाली. यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पंरतु ४८.५ षटकांत त्यांचा संपुर्ण संघ २३२ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून मोहम्मद मिथूनने सर्वाधिक ६२ धावा केल्या.
त्यानंतर ५० षटकांत २३३ धावांच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने ४४.३ षटकांत २३३ धावा केल्या. यात मार्टीन गप्टीलने ११६ चेंडूत नाबाद ११७ धावांची खेळी केली. यात ४ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडकडून केले मोठे पराक्रम-
-या शतकी खेळीबरोबर न्यूझीलंडकडून वनडे सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आला आहे. राॅस टेलर (२०), नॅथन अॅस्टल (१६) आणि मार्टिन गप्टील (१५) हे आता न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतके करणारे खेळाडू ठरले आहेत.
-न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ६व्या स्थानी आला आहे. त्याने १११५१ धावा करत मार्टीन क्रो यांच्या १११४८ धावांचा विक्रम मागे टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने