सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इतिहास रचला आहे. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या 6 षटकांत म्हणजेच पॉवरप्लेमध्ये विक्रमी 125 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर होता. आयपीएल 2017 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिल्या 6 षटकात 105 धावा केल्या होत्या.
आता सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. पॅट कमिन्सच्या संघानं या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्सला मागं टाकले. चेन्नई सुपर किंग्ज या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्या 6 षटकात 2 गडी गमावून 100 धावा केल्या होत्या. तर आयपीएल 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या 6 षटकात 90 धावा केल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या 6 षटकात 1 गडी बाद 88 धावा केल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अभिषेक शर्मानं 12 चेंडूत तुफानी 46 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले. तर ट्रॅव्हिस हेड अवघ्या 32 चेंडूत 89 धावा करून बाद झाला. त्यानं 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. यासह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात 10 षटकांमध्ये 150 पेक्षा जास्त धावा ठोकणारा पहिला संघ बनला आहे. त्यांनी दिल्लीविरुद्ध 10 षटकांमध्ये 158 धावा ठोकल्या.
बातमी अपडेट होत आहे
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादविरुद्ध ऋषभ पंतनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; एका क्लिकवर जाणून घ्या प्लेइंग 11