---Advertisement---

यष्टीरक्षक एमएस धोनीने केला हा खास विक्रम

---Advertisement---

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात कॅप्टन कूल एम एस धोनीने नाबाद अर्धशतक केले आहे. हे अर्धशतक करताना यष्टीरक्षक धोनीने एक खास विक्रम केला आहे.

धोनीने आज २८ चेंडूत ५२ धावा करताना ३ षटकार खेचले. त्यामुळे त्याचे आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ४६ षटकार झाले आहेत. या षटकारांबरोबरच तो यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने ही कामगिरी करताना इंग्लंडच्या जॉस बटलरचा ४३ षटकारांचा विक्रम मागे टाकला.

यष्टीरक्षक म्हणून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद ६८ षटकारांसह अव्वल स्थानी असून त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम ५८ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.

याबरोबरच धोनी भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे. तर जगात पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आंतराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ३४१ षटकार मारले आहेत.

आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे यष्टीरक्षक:

मोहम्मद शहजाद – ६८ षटकार
ब्रेंडन मॅक्युलम – ५८ षटकार
एमएस धोनी – ४६ षटकार
जॉस बटलर – ४३ षटकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment