इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील 24 वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा या सामन्यावर असतील. आरसीबीने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 3 सामने खेळळून ते सर्व जिंकले आहेत. दरम्यान या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हा महत्त्वाचा सामना आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास ती फलंदाजीसाठी अतिशय योग्य मानली जाते, ज्यामध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या 167 धावा असू शकते परंतु लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ 200 पेक्षा जास्त धावांचा सहज पाठलाग करताना दिसतो, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेईंग इलेव्हन – विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन – जेक फ्रेझर मॅकगुर्क, केएल राहुल (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.
या सामन्यात, विराट कोहलीची कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, आतापर्यंत या हंगामात तो अपेक्षेप्रमाणे खेळला आहे. चाहते विराट आणि मिशेल स्टार्कमधील सामना पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, केएल राहुल दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे त्याचे घरचे मैदान आहे, त्यामुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा येथील खेळपट्टीची चांगली कल्पना असेल, परंतु राहुलला हेझलवुडच्या गोलंदाजीचाही सामना करावा लागेल, जे त्याच्यासाठी सोपे काम असणार नाही.
जर आपण आकडेवारी पाहिली तर, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 31 सामन्यांपैकी आरसीबीने 19 सामने जिंकले आहेत तर दिल्लीला फक्त 11 सामने जिंकता आले आहेत. त्याच वेळी, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 7, दिल्लीने 4 जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता, या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाचा वरचष्मा असू शकतो. मात्र, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सामन्यात काहीही भाकित करणे कठीण आहे.




