तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आशिया चषकाचा विचार केला गेल्यास भारतीय संघातील तीन असे खेळाडू आहेत, ज्यांनी आशियातील या सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याची कामगिरी केली आहे. आज आपण त्याच खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आशिया चषकामध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. हिटमॅनने आशिया कपमध्ये भारतासाठी खेळलेल्या २६ डावांमध्ये आतापर्यंत २१ षटकार ठोकले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट ९० आहे. तसेच त्याची सरासरी ४२.३० इतकी प्रभावी आहे. आशिया चषक इतिहासात त्याच्या नावे एक शतक असून, आशिया चषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यावर ८८३ धावा जमा आहेत.
भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी अनेक वर्ष पेललेल्या सुरेश रैनाने भारतीय संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. आशिया चषकामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने १८ षटकार ठोकले आहेत. आशिया चषकात १६ डाव खेळलेल्या रैनाने ५८६ धावा केल्या आहेत. रैनाने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१० आणि २०१६ मध्ये आशिया चषक जिंकला होता. धोनीला जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानले जाते. आशिया चषकामध्ये भारतासाठी खेळलेल्या २० डावांमध्ये धोनीने ९१.२ च्या स्ट्राईक रेटने एकूण १६ षटकार ठोकले आहेत. धोनीने आशिया चषक इतिहासात ६९० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?
द हंड्रेडमध्ये डेविड मलानचा राडा! २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या तब्बल ‘इतक्या’ धावा





