---Advertisement---

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं! एकाच सामन्यात पडला ‘एवढ्या’ षटकारांचा पाऊस

---Advertisement---

बहुप्रतिक्षीत आयपीएल 2020 चा हंगाम अखेर 19 सप्टेंबरपासून सुरु झाला. या हंगामातील चौथा सामना मंगळवारी शारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव केला.  या सामन्यात विक्रमी 33 षटकार लागले. यापूर्वी 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झालेल्या सामन्यात सर्वाधिक 33 षटकार मारण्यात आले होते.

या ३३ षटकारमध्ये या खेळाडूंचा होता मोठा वाटा – 

– चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने सामन्याच्या शेवटच्या षटकात सलग 3 षटकार लगावले. त्याने 17 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.

– राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनने सामन्यात सर्वाधिक 9 षटकार ठोकले. त्याने 32 चेंडूत 74 धावा केल्या.

– चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज फाफ डु प्लेसिसने 7 षटकार ठोकले. त्याने 37 चेंडूत 72 धावा केल्या.

– राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने 4 षटकारांच्या मदतीने 47 चेंडूंत 72 धावा केल्या.

– चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार लगावले.

– राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने 8 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 27 धावा फटकावल्या.

– चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू सॅम करनने 2 षटकारांच्या मदतीने 6 चेंडूत 17 धावा केल्या.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---